शेतकèयांनी गुलाम मानसिकतेसोबतच राजकीय पक्षाचे पट्टे सोडण्याची गरज-बबलू कटरे

0
10

तिरोडा,दि.१३ःआपला देश एकेकाळी म्हणजे बळीराजाच्या काळात सुखी समृध्दी होता.परंतु कपटी वामनाने बळीराजाची हत्या केली आणि तेव्हापासूनच या देशाचा पोqशदा असलेला शेतकरी होरपळला जाऊ लागला आहे.आज जरी कृषीप्रधान देश असल्याचे सांगत असलो तो देखावा असून शेतकरी बांधवानी आपल्या न्याय हक्कासाठी राजकीय पक्षाचे गळ्याला बांधलेले गुलामीचे पट्टे सोडून संघर्ष केल्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे यांनी केले.ते तिरोडा येथील पोलीस स्टेशन समोरील पटागंणात शेतकरी सेवा समितीच्यावतीने रविवारला आयोजित एकदिवसीय धरणे आंदोलनात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.यावेळी सेवा समितीचे अध्यक्ष नरेंद्र रहागंडाले,ओबीसी संघर्ष कृती समितीचे कार्याध्यक्ष अमर वराडे,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रसिध्दीप्रमुख व ओबीसी संघर्ष कृती समितीचे मार्गदर्शक खेमेंद्र कटरे,वरिष्ठ शेतकरी नेते कृष्णकुमार दुबे,डॉ.दिनदयाल पटले,डॉ.मिलिंद्र पटले,भुमेश्वर रंगारी,जगदिश कोहळे,सुनिल टेंभरे,शिशुपाल पटले,सुभाष मेश्राम,सहेसराम पटले,सुनिल पारधी,निलकंठ रहागडांले,विजय शिरसागर,भुमेश्वर पारधी,धनराज पटले,हेमराज पटले,लखन रहागंडाले आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना कटरे म्हणाले की गेल्या ६०वर्षात काँग्रेसने गरीबी हटावचा नारा देत शेतकèयांची फसवणूक केल्यानेच त्यांनी सत्ता परिवर्तनाचा निर्णय भाजपच्या एकच नारा सात बारा कोरा या घोषणेवर विश्वास ठेवून केला.परंतु राज्य व केंद्रातील विद्ममान सरकारही शेतकरी विरोधी निघाली असून सातबारा तर कोरा केलाच नाही उलट हमीभाव दिले नाही.कर्जमुक्तीचे गाजर दाखविले परंतु अद्यापही कर्जमुक्ती झालेली नाही उलट पिक विम्यासाठी अधिकारी गावोगावी फिरले परंतु त्याच कंपनीकडून विम्याची भरपाई मिळवून द्यायला विसरले तेव्हा शेतकरी बांधवानी आपल्याला न्याय मिळवून घ्यायचा असेल तर आपण जे आपल्या गळ्याला मी या राजकीय पक्षाचा असे पट्टे बांधून ठेवले ते शेतकरीहितासाठी सोडून एकत्र येऊन संघर्ष केल्याशिवाय होणार नसल्याचे म्हणाले.यावेळी अमर वराडे यांनीही सध्याची सरकार ही शेतकèयांना त्रास देण्याचे काम करीत असून पैसा नसलेला माणून रात्रदिवंस ऑनलाईन केंद्रावर जाऊन कर्जमुक्तीचे फार्म भरत होता परंतु त्याच्या मदतीला अद्यापही सरकार धावलेले नाही,तेव्हा सामाजिक न्यायासाठी सामाजिक संघटनासोबत येण्याचे आवाहन त्यांनी केले.कृषक सहकारी संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार दुबे यांनी सरकार कुणाचेही असो ते शेतकरी विरोधी व व्यापारी हिताचे असे सांगत शेतकरी बांधवानो धापेवाडा प्रकल्प हा अदानीसाठी नव्हे तर शेतीसाठी तयार केलेला प्रकल्प होय हे लक्षात ठेवा असे सांगत आजचे शेतकरीपुत्र लोकप्रतिनिधी हे व्यापारी झाल्याची टिका केली.शेतकरी संघटीत होऊ नये यासाठी विविधस्तरावरुन प्रयत्न केले जातात परंतु आपण जी शेतकरी सेवा समितीच्यावतीने सुरवात केली ती योग्य असून राजकारणासाठी लढा नको तर शेतकरी हक्कासाठी संघर्ष उभारा आपण पाठीशी असल्याची ग्वाही दिली.यावेळी समितीचे सयोंजक नरेंद्र रहागंडाले यानी शेतकरी सेवा समितीची विस्तृत माहिती देत समिती शेतकरी हितासाठीच काम करणार असल्याची ग्वाही दिली.यावेळी शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.