आसरअल्ली तालुक्याची निर्मिती करा-आदिवासी विद्यार्थी संघाचे निवेदन

0
15

आल्लापल्ली,दि. १३ : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त, डोंगराळ व जंगलव्याप्त असलेल्या सिरोंचा तालुका हा ब्रिटीशकालीन काळापासून अविकसीतच राहिलेला आहे. स्वातंत्र्याकाळतही या दुर्गम भागाचा विकास खुंटीतच राहिलेला आहे. या तालुका परिसरातील अनेक दुर्गम भाग सर्वांगीण विकासापासून कोसो दूर आहे. त्यामुळे या दुर्गम गावातील विकासाच्या दृष्टीने सिरोंचा तालुक्याचे विभाजन करुन आसरअल्ली या नवीन तालुक्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघ शाखा सिरोंचातर्फे तहसिलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा मुख्यालयापासून आसअरल्ली हे गाव २५० किमी अंतरावर आहे. तर सिरोंचा तालुक्याचा शेवटचा टोक पातागुडम ५५ किमी अंतराववर वसलेले आहे. आसरअल्ली या महसूल मंडळ क्षेत्रात १४ ग्राम पंचायत येत असून यामध्ये वडदम, टिचूर अमडेली, नडिकुडा, पोचमपल्ली, कोत्तापल्ली, चिंतारेवला, कंबालपेठा, गंजीरामन्नापेठा, दुब्बापल्ली, रंगधामपेठा, लक्ष्मीदेवीपेठा, अंकीसा, गंजीरायपल्ली, मुगामेततम, बालमुत्यामपल्ली, गेर्रापल्ली, इप्पलपल्ली, जंगलपल्ली, बोर्रायगुडम, गोल्लागुडम, आसरअल्ली, सुंकरअल्ली, मोटला टेकडा, मुत्तापूर, मुक्कीडीगुट्टा, गुम्मलकोंडा, सोमनूर, अमडेली, पिट्टेवाही, कर्जेली, मंगीगुडम आदी गावांचा समावेश अहो. हा संपूर्ण भाग स्वातंत्र्यकाळापासून अविकसीतच राहिलेला आहे. सदर सर्व गावे नक्षलग्रस्त, जंगलव्याप परिसरातील आहेत. त्यामुळे या सर्व गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आसरअल्ली या गावाची नवीन तालुका निर्मिती आवश्यक आहे.  या दुर्गम भागाचा सर्वांगीण विकास तसेच जनतेच्या अपेक्षा लक्षात घेता त्वरीत आसरअल्लीला नवीन तालुकास्थळ घोषित करावे, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा आविसने नायब तहसिलदार एच. एस. सय्यद यांना निवेदनातून दिला आहे. यावेळी शिष्टमंडळात आविसचे तालुकाध्यक्ष बानय्या जनगम, आविसचे सल्लागार रवी सल्लमवार, आसरअल्लीचे संतोष भिमकारी, समय्या तोरकरी, रसूल शेख महबूब, तुमडे शिवराय, संजय चिंताकाणी, श्रीशैलस सोरला, समय्या चौधरी, शरद खुंडे, गणेश टेकाम, रामय्या कोडापे, समय्या गावडे, संतोष चेल्लूरी आदींसह आदिवासी विद्यार्थी संघाचे सदस्य उपस्थित होते.