१८ नोव्हेंबरपर्यंत कायदेविषयक जनजागृतीचे विविध उपक्रम विधी सेवा दिनानिमीत्त रॅली

0
15

गोंदिया,दि.१५ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समिती आमगाव, देवरी, सडक/अर्जुनी, अर्जुनी/मोरगाव व तिरोडा यांच्या वतीने १८ नोव्हेंबरपर्यंत कायदेविषयक जनजागृती विविध उपक्रमाचे आयोजन जिल्ह्यात करण्यात आले आहे. या दरम्यान घरोघरी जावून, बसस्थानके व सार्वजनिक ठिकाणी कायदेविषयक जनजागृती करण्यात येणार आहे. या दरम्यान हस्तपत्रकेचे वितरण, कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय विधी सेवा दिनाचे औचित्य साधून १० नोव्हेंबर रोजी जिल्हा न्यायालय परिसरात रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कमलाकर कोठेकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी सर्व न्यायीक अधिकारी, रिटेनर लॉयर, जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य, जिल्हा न्यायालयातील कर्मचारी वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.