शेकडो शेतकऱ्यांचा तेल्हारा तहसील कार्यालयाला घेराव!

0
10

अकोला,दि.15: तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पाचे पाणी कायमस्वरूपी अनारक्षीत करण्यासाठी शेतकरी संघटनेने आंदोलन उभारले असून आज (बुधवार) तेल्हारा तहसील कार्यालयावर लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचा एल्गार धडकला. वानच्या पाण्यावरील आरक्षण कायमस्वरूपी उठवण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रचंड उद्रेक आज दिसून आला. संतप्त शेतकऱयांनीं तहसीलदारांना घेराव घालून कामकाज बंद पाडले. आजच्या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी महिला आघाडीच्या पदाधिकारी व शेतकरी महिलाही आंदोलनात अग्रभागी होत्या. शेतकरी संघटनेचा लढा धरणाचे कायमस्वरूपी आरक्षण उठवण्यासाठी असून, यासाठी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उद्रेक आहे. शासन, प्रशासनाने याची योग्य वेळी दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र होत जाऊन या समोरील आंदोलनाचा टप्पा म्हणून धरणाच्या लाभक्षेत्रात सर्व पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात येणार आहे. यावेळी जोत्स्ना ताई बहाळे, सतीश देशमुख, विलास ताथोड, डॉ. निलेश पाटील, गजानन बोरोकार, लक्समिकांत कौंटकर, विक्रांत बोन्द्रे, प्रफुल बदरखे, प्रदीप गवई आणि शेकडो शेतकरी संघटनेचे कार्यकरते व शेतकरी उपस्थित होते.

.