मटण पार्टी करणारे चार कर्मचारी निलंबित

0
35

गोंदिया : नगर परिषदेद्वारा संचालित शहरातील माताटोली हायस्कूलमध्ये मटण पार्टी करणाऱ्या चौघांवर अखेर पालिका प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली. सोमवारी तसे आदेश चौघांनाही पाठविण्यात आले आहेत.शाळेत मटण पार्टी करताना रंगेहात मिळून आलेल्या इरशाद शेख, रविकांत शर्मा, विनोद टेंभुर्णे व अनिल तिडके या चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी (दि.२७) सायंकाळी चौघांच्या निलंबन आदेशावर मुख्याधिकारी मोरे यांनी सायंकाळी स्वाक्षरी केली. बुधवारी (दि.२८) सकाळी या चौघांच्या निलंबनाचे आदेश शाळेत पाठविण्यात आले. मात्र इतर सहभागी शिक्षकांवर कारवाई होणार का? अशी चर्चा आहे.मटण पार्टी करताना चौघे मिळून आले हे जरी खरे असले तरी या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. त्याचे कारण असे की, एका व्यक्तीच्या जन्मदिनाची पार्टी साजरी करण्यासाठी या चौघांवर जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानुसार ते चौघे शाळेत अन्य पाहुण्यांच्या खातरदारीसाठी तत्पर होते, अशी माहिती आहे. यातील अन्य पाहुणे निसटून गेले व हाती आलेले हे चौघे मात्र अडकले.