उत्कृष्ट काम करणा-या मापा-याचा मुख्य प्रशासक पाल यांच्या हस्ते सत्कार

0
9

सावली,दि.22 -सावली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार व्याहाड खुर्द येथील कार्यालयात (दि.21) मंगळवारला बाजार समितीचे मुख्य प्रशासक अविनाश पाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उत्कृष्ठ काम करणार्या मापार्यांच्या सत्कार करण्यात आले.या बैठकीत सन 2016-17 व चालू आर्थिक वर्षाचा गोषवारा सादर करण्यात आला.तसेच उत्कृष्ट काम करणारे मापारी गणेश मगरे, धनवान चलाख,दिलिप चुधरी, विलास मुघांटे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.प्रामाणिकपणे काम करण्याची जबाबदारी आपली असून नव्या उमेदीने काम करावे व शेतक-याच्या हिताचा विचार करुन बाजार समितीचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावे असे आवाहन पाल यांनी केले.जे मापारी उत्कृष्ट काम करून उत्पन्न वाढविणार अशा मापा-यांच्या कामाची दखल घेऊन पारीतोषीक देण्याची घोषणा मुख्य प्रशासक पाल यांनी केली. यावेळी व्याहाड व सावली येथे मार्केट यार्ड सुरु करण्याविषयी चर्चा करण्यात आली.या बैठकीला उपमुख्य प्रशासक विनोद गड्डमवार, प्रशासक सूधाकर गोबाडे, अरूण पाल, अर्जून भोयर, शरद सोनवाने, पुनम झाडे, गुरूदेव भूरसे, अशोक नागापुरे, रविंद्र साखरे, भुवन सहारे, पुष्पाताई शेरकी, सचिव नरेश सुरमवार व बहूसंख्य मापारी, कर्मचारी उपस्थित होते.