तालुक्यातील सात ग्रा.पं. पैकी चार ग्रा.पं. वर आविसची एकहाती सत्ता

0
7

सिरोंचा तालुक्यातील उपसरपंच पदाच्या निवडणुकीतही आविसने मारली बाजी

आलापल्ली,दि.23ः- : सिरोंचा तालुक्यातील सात ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका मागील महिन्यात पार पडल्याअसून यात प्रामुख्याने बेज्जुरपल्ली, जाफराबाद,मादाराम, तुमनूरमाल, वडदम, नडीकुडा , सोमनपल्ली या ग्रामपंचायतीच्या समावेश असून या पैकी आविसने माजी आमदार दीपकदादा आत्राम आणि जि. प.उपाध्यक्ष अजयभाऊ कंकाडलवार यांच्या नेतृत्वात पाच ग्रामपंचायतीची निवडणुका लढविली तर पाच पैकी चार ग्राम पंचायतीचे सरपंच हे आविस ने निवडून आणले होते.
काल पार पडलेल्या ग्राम पंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीतही आविसने बाजी मारत चार ठिकाणी आपले उपसरपंचांना निवडून आणत आपले वरचष्म कायम ठेवले.
मागील महिन्यात पार पडलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत आविसने जाफराबाद येथे सडमेक बापू पापय्या, मादाराम सरिता मारा गावडे, तुमनूरमाल गुरुसिंग किष्टय्या रामय्या,तर सोमनपल्ली येथे तलांडी सरोजनी बसवय्या यांना निवडून आणले .काल पार पडलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत जाफराबाद येथे दुर्गम तिरुपती बानाय्या, मादाराम येथे भंडारी विजयालक्ष्मी महेश, तुमनूरमाल येथे वेमुला बबिता किरण तर सोमनपल्ली येथे गावडे रमेश चेन्नय्या यांना निवडून आणले. यामुळे तालुक्यातील सात ग्राम पंचायत पैकी चार ग्राम पंचायतीवर आविसला एकहाती सत्ता बसविण्यात यश आले. चारही ग्राम पंचायतीवर एकहाती सत्ता आल्याने आविसचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडून सर्वत्र विजयोत्सव साजरा केले.
एकंदरीत आविसने तालुक्यात आविसचे विदर्भ नेतृत्व आणि माजी आमदार दीपकदादा आत्राम आणि आविसचे युवा नेतृत्व व जि. प. उपाध्यक्ष अजयभाऊ कंकाडलवार यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनात निवडणुका लढवित आणि बहुमताने जिंकत तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना तगडा आव्हान देत आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात आविस स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या माध्यमाने येत्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र या निमित्याने दिसून येत असून सिरोंचा तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतीपैकी अर्धेअधिक ग्रामपंचायत हे आजच्या दिवशी मात्र आविसच्या ताब्यात आहेत ..हे विशेष..