पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘संकल्प समतेचा‘ चित्ररथाचा शुभारंभ

0
21

गोंदिया,दि.२४ : मागील तीन वर्षात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने विविध घटकांसाठी अनेक योजना प्रभावीपणे राबविल्या आहे. तसेच अनेक महत्वपूर्ण कामे सुध्दा केले आहेत. लंडनमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेत असतांना वास्तव्य केलेले घर देखील घरेदी केले आहे. मुंबई येथे इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार आहे. अनुसूचित जातीच्या कल्याणाचा निधी इतर योजनेसाठी खर्च होणार नाही. चित्ररथाच्या माध्यमातून समाजकल्याण विभागाच्या योजनांची माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
जिल्हा परिषद कार्यालयात २३ नोव्हेंबर रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनांवर आधारीत ‘संकल्प समतेचाङ्क या जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या चित्ररथाचा शुभारंभ पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. यावेळी ते बोलत होते. जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, उपाध्यक्ष रचना गहाणे, शिक्षण व आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे, कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, गोंदिया पं.स.सभापती माधुरी रहांगडाले, सालेकसा पं.स.सभापती हिरालाल फाफनवाडे, सडक/अर्जुनी पं.स.सभापती कविता रंगारी, अर्जुनी/मोर पं.स.सभापती अरविंद शिवणकर, गोरेगाव पं.स.सभापती दिलीप चौधरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गावडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री.मुंढे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
चित्ररथाच्या शुभारंभ प्रसंगी जि.प.मुख्य लेखा व वित्त अधिकारी अनंता मडावी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सर्वश्री वाळके, श्री.पारखे, श्री.राठोड, राजेश बागडे, श्री.भांडारकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, कृषि विकास अधिकारी वंदना शिंदे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) उल्हास नरड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.विश्वकर्मा, जिल्हा समाजकल्याण अधिकारी मिलींद रामटेके, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री.चंद्रिकापुरे यांच्यासह सर्व पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार विस्तार अधिकारी वैशाली खोब्रागडे यांनी मानले.
०००००