अशोक लटारे नवे अपर जिल्हाधिकारी

0
11

गोंदिया,दि.२८ : अपर जिल्हाधिकारी म्हणून अशोक लटारे हे नुकतेच गोंदिया येथे रुजू झाले आहे. यापूर्वी अपर जिल्हाधिकारी म्हणून मंगेश मोहिते हे कार्यरत होते. त्यांची बदली अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पदोन्नतीने अपर आयुक्त म्हणून झाली आहे. श्री.लटारे यांची नियुक्ती राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून नायब तहसिलदार या पदी वर्धा येथे १९८५ ला झाली. त्यांनी वर्धा व पुलगाव येथे १९८५ ते १९९३ दरम्यान काम केले आहे. त्यानंतर त्यांची पदोन्नती झाल्यानंतर १९९३ ते १९९६ दरम्यान सिंदेवाही येथे तहसिलदार. १९९६ ते १९९८ दरम्यान नागभिड येथे तहसिलदार. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे १९९८ मध्ये आठ महिने तहसिलदार म्हणून काम केले. मे १९९९ ते ऑक्टोबर १९९९ दरम्यान मंत्रालयात तत्कालीन व्यापार व वाणिज्य मंत्री डॉ.रमेश गजबे यांचे खाजगी सचिव म्हणूनही त्यांनी काम केले. त्यानंतर नागपूर येथे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सहा महिने काम केले. मे २००० ते ऑगस्ट २००३ मध्ये ते उपविभागीय अधिकारी उमरेड. ऑगस्ट २००३ ते ऑक्टोबर २००५ मध्ये नागपूर येथे उपजिल्हाधिकारी (जमीन). ऑक्टोबर २००५ ते मार्च २००९ दरम्यान उपविभागीय अधिकारी वर्धा. मार्च २००९ ते जुलै २०११ दरम्यान भंडारा येथे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन). जुलै २०११ ते फेब्रुवारी २०१४ मध्ये उमरेड येथे उपविभागीय अधिकारी. फेब्रुवारी २०१४ ते मार्च २०१५ मध्ये उपविभागीय अधिकारी तुमसर. एप्रिल २०१५ ते ऑगस्ट २०१७ मध्ये भंडारा येथे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) म्हणून काम केले. २३ ऑगस्ट २०१७ ते १७ नोव्हेंबर २०१७ दरम्यान ते उपविभागीय अधिकारी म्हणून देवरी येथे कार्यरत होते. श्री.लटारे यांची पदोन्नतीने राज्य शासनाने अपर जिल्हाधिकारी म्हणून निवड केल्यानंतर ते २० ऑक्टोबर रोजी गोंदियाचे अपर जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले आहे.