संविधानाने माणसाला माणसाप्रमाणे जगण्याचा मार्ग दाखविला- सरपंच डी.यु.रहांगडाले

0
19

गोंगलेत संविधान दिन साजरा
गोंदिया,दि.२ : भारतीय संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ व आदर्श आहे. देशातील विविध जाती, धर्म, पंथ आणि भाषांना एकसंघ ठेवण्याचे काम भारतीय संविधानाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. भारतीय संविधानाने माणसाला माणसाप्रमाणे जगण्याचा मार्ग दाखविला. असे प्रतिपादन गोंगलेचे सरपंच डी.यु.रहांगडाले यांनी केले.
गोंगले येथे २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विशेष अतिथी म्हणून श्री.रहांगडाले बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी मनोहर चंद्रिकापूरे हे होते. मुख्य वक्ता म्हणून गोरेगाव तहसिलदार कल्याण डहाड उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरुन बोलतांना श्री.चंद्रिकापूरे म्हणाले, समाजात एकता, राष्ट्रप्रेम, समता व बंधुता कायम ठेवण्याचे काम भारतीय संविधानामुळे होत आहे. संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ आहे. समाजातील शोषित, वंचित, पिडीत व मागास घटकांच्या कल्याणासाठी संविधान हे मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.डहाट म्हणाले, आधुनिक समाजाच्या जडणघडणीत व तळागाळातील लोकांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले. डॉ.आंबेडकरांनी देशातील लोकांच्या कल्याणासाठी अत्यंत अभ्यासपूर्ण संविधान लिहिल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला डुंडा येथील सरपंच रविंद्र टेंभूर्णे, गोंगलेचे उपसरपंच भुमेश्वर बोपचे, रेंगेपारचे उपसरपंच दामोधर बोपचे, माजी सरपंच प्यारेलाल रहांगडाले, तंटामुक्तीचे अध्यक्ष वासुदेव रहांगडाले, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत येळे, ग्रामपंचायतच्या सचिव पुष्पा चाचेरे, भोजराज चौधरी, मुलचंद रहांगडाले, गुड्डू गावळ, रंजीत ठाकरे, अतुल बिसेन यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.