एक दिवस सायकल आज फोरमच्या उपक्रमाचा 25 वा आठवडा 

0
21
गोंदिया दि.४  :  जेसीआई गोंदिया राईस सिटी व आज फोरमने सुरु केलेल्या एक दिवस सायकलच्या नावे या उपक्रमास या रविवारला 25 आठवडे पुर्ण झाले असून उपक्रमाच्या माध्यमातून दर रविवारला सायकल चालविण्याचा संदेश दिला जात आहे.ग्लोबल वार्मिंगमुळेव विकसित देशामध्ये पर्यावरण प्रदूर्षण कमी करण्यासाठी विविध उपक्रम सुरु आहेत.त्यातच इंधनावरील गाड्यामुळे प्रर्दुषणात सातत्याने वाढ होत चालली आहे.त्याचे परिणाम आरोग्यासह पर्यावरणावर होत असल्याने गोंदिया राईस सिटी व आज फोरमच्यावतीने एक दिवस सायकलच्या नावे हा उपक्रम सुरु करुन गोंदिया शहरवासियांना एक दिवस वाहनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जात आहे. हा उपक्रम आज फोरमच्या मंजू कटरे  व जेसीआई गोंदिया राईस सिटी चे अध्यक्ष ओमप्रकाश (रवी) सपाटे यांच्यासह सर्व चमूने सुरु केला आहे. या कार्यक्रमात ब्लेक ऍण्ड वाईट असे ड्रेस कोड ठेवण्यात आले. ज्या मध्ये डिजेल आणि  पेट्रोल एक दिवस वापरू नये, सायकल चालवा पर्यावरण वाचावा, सायकल चालवा स्वतःला  फिट ठेवा असा संदेश दिला जातो. सकाळी ६ .३० ला गांधी प्रतिमा येथून ही सायकल फेरी सुरु करुन जय स्थंतचौ,मनोहर चौक,आर.टी.ओ.आॅफिस,जिल्हाधिकारी कार्यालय,मामाचौक मार्गे परत गांधी प्रतिमा येथे समारोप करण्यात येते. सायकलिंग मध्ये दुर्गेश रहागंडाले, मंजू कटरे, रवी सपाटे, दुर्गेश रांगडाले, सौरभ जैन, शैलेन्द्र कावळे, नितिन मेश्राम, स्वाति चौहान,मधुलिका नागपूरे, मयूर कांबळे , प्रशांत बंसोड़, राम लालवानी, श्याम लालवानी, निकिता बंसोड़, पायल खोब्रागडे, हनी मेश्राम, पलक, सचिन लिल्हारे, हरिकृष्ण राव आदींनी सहभाग घेतला.