१३४ रूग्णांची आरोग्य तपासणी : माोफत औषधीचे वाटप

0
13
आमगाव ,दि.४  : पदमपूर येथील यशोदा बहुउद्देशिय विकास संस्था, उडाण बहुउद्देशिय विकास संस्था, पतंजली योग चिकीत्सालय आमगाव यांच्या संयुक्त विद्यामाने पदमपूर येथील तुकडोजी चौकात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात १३४ रूग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधी वाटप करण्यात आली.
कार्यक्रमाचे उदघाटन तहसीलदार सोहबराव राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक शशीकांत दसुरकर, डॉ. नवनाथ रोकडे, डॉ.संतोष येवले, पतंजली चिकीत्सालयाच्या संचालीका सुमनदेवी पटले, मुख्याध्यापक शरद उपलपवार उपस्थित होते. यावेळी रक्तदाब, मधूमेह, हात दुखणे, पाय दुखणे, सर्दी, खोकला अश्या विविध आजारांवर उपचार करण्यात आला. थंडीपासून आपला बचाव ककसा करावा तसेच घरघुती वापराच्या साहित्यातून आपले छोटे-छोटे आजार कसे दूर पळविता येतात यावर सुमनदेवी पटले यांनी टिप्स दिल्या.संचालन व प्रास्ताविक नरेश रहिले यांनी केले. तर आभार प्रेमानंद पाथोडे यांनी मानले.यशस्वीतेसाठी हार्दीक भुते, हरिष भुते, नरेश बोहरे, आशिष तलमले, अतूल फुंडे, रविकांत पाऊलझगडे, प्रेमानंद पाथोडे, सचिन तलमले, सुनिल हुकरे, शैलेश लक्षणे, लोकेश बोहरे,  शंकर कोरे, आकाश शेंडे, कुणाल कावळे, दिनेश गिºहेपुंजे,  दीपक भांडारकर, राहूल गायधने, अजय बावणे, प्रतिक करंडे, आनंद पिछोरे  यांनी सहकार्य केले.