गोंदिया वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे आंदोलन मंगळवारला

0
6

गोंदिया दि. ४: स्वतंत्र्य वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासह आदी मागण्या त्वरीत मान्य करण्यात याव्यात यासाठी उद्या  ५ डिसेंबरला येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी धरणे आंदोलनांतर्गत आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती गोंदिया वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे अध्यक्ष प्रमोद भोयर यांच्यासह पदाधिकाºयांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
वृत्तपत्र संघटनेतर्फे शानदरबारी यापुर्वी विविध मागण्यांसाठी अनेकदा निवेदने दिली आहेत. मागण्यांच्या पुर्ततेसाठी संबंधीत विभागाकडून आश्वासने देखील मिळाली आहेत. राज्य संघटनेच्या शिष्टमंडळाची जुलै २०१७ मध्ये कामगार मंत्री संभाजी पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. आॅगस्ट २०१७ आगोदरच कल्याणकारी मंडळ स्थपनेबाबत आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्यापही आश्वासनांची पुर्तता झालेली नाही. त्यामुळे कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेसाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्टÑ राज्य संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार आहे. आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष प्रमोद भोयर, उपाध्यक्ष राजेश साठवणे, कार्याध्यक्ष राजेश वैद्य, सचिव हर्षदीप उके, कोषाध्यक्ष दुर्गाप्रसाद अग्रहरी, म.रा.कार्य. दिनेश उके, हरजीत वाढई, भाष्कर कडव, जयेश मेश्राम,  गुणवंत कडव, रामू शरणागत, विकास अंबादे, महेश तरोणे आदिंनी केले.