वडेट्टीवारानी केली दुर्घटना ग्रस्त कोळसा खाणीची पाहणी

0
14

चंद्रपूर,दि.4ः- वेकोली माजरीच्या जूना कुनाडा कोेळसा खाणीत ३० नोव्हेम्बरच्या रात्री 1 वाजेच्या दरम्यान अर्धा किलोमीटरचा तीनशे मीटर ऊंची असलेले मातीचे दरळ कोसळल्याने सहा कामगार दबले होते. दबलेले सहा कामगाराना बाहेर काढून उपचाराकरिता तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेत धनसार इंजिनीरिंग कंपनी प्रा. लि. चे आठ वॉल्वो टिप्पर, चार पीसी मशीन , एक डोजर , दोन ड्रील मशीन, एक सर्विस वैन , व दोन पाणीचे मोटर अंदाजे पन्नास कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे.सदर दुर्घटना वेकोलि व खाजगी कंपनीच्या हलगर्जीपणा मुळे अधिक कोेळसा उत्पादन करण्याच्या नादात कामगारांचा जीव धोक्यात घालून उत्पादन केले जात होते.

एका आठवाडयात दोन घटना झाल्याचे बघून शनिवारला महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्ष उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी  जूना कुनाडा व तेलवासा कोळसा खाणीची पाहणी केली. दोन्ही उपक्षेत्राचे उपक्षेत्रीय खाण प्रबंधक पंकज कुमार व आर. पी. सिंग याना धारेवर धरले.दरम्यान वडेट्टीवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले कि शासन व वेकोली प्रशासन आपसी संगनमत करुन कामगारांचे शोषण करत आहे. दोन्ही खाणी असुरक्षित असताना सुद्धा जबरीने कामगारांचा जीव धोक्यात घालून काम करुन घेत आहे.अधिकाऱ्यांचे अश्या प्रकारचे धोरण खपवून घेतले जाणार नाही.11 डिसेम्बर पासून सुरु होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाला या बाबत जाब विचारून दोन्ही दुर्घटनेची चौकशी करण्याकरिता समिति गठित करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. शासनाने वेकोलीमध्ये १३ खाजगी कंपनीला काम दिले आहे. आता हे खाजगी कंपन्या कामगारांचा शोषण करीत आहे. कामगार खदानाची परिस्थिति पाहुन काम करण्यास नकार दिले तर कामगारांच्या पगारात कपात करण्याचे निर्देश कंपनीकडून मिळत होते . पगारात कपात होण्याची भीतिने कामगार जीव धोक्यात घालून काम करत होते.