उन्हाळी धानपिकासाठी शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर!

0
16
धान उत्पादक शेतकरी संघटनेचे निवेदन
– अर्जुनी-मोर तालुक्यात उन्हाळी धानपिकाची मागणी
गोंदिया,दि.4 :अपुरा पाऊस व रोगराईजन्य परिस्थितीमुळे यंदा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकèयांचा खरीप हंगाम समाधानकारक झाला नाही. त्यामुळे शेतकèयांपुढील आर्थीक संकट वाढले आहे. अर्जुनी-मोर तालुक्यात उपलब्ध असलेल्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पीक होऊ शकते. जिल्हाधिकाèयांच्या आदेशामुळे शेतकरी हवालदील बनला आहे. त्यामुळे अर्जुनी-मोर तालुक्यातील शेतकèयांचे हित व उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता जिल्हाधिकाèयांनी तालुक्यात उन्हाळी धानपिक लावण्यात परवानगी द्यावी, अशी मागणी धान उत्पादक शेतकरी संघटना अर्जुनी-मोरद्वारे करण्यात आली. या अनुषंगाने आज ४ डिसेंबर रोजी प्रभारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना एक निवेदनही देण्यात आले.
जिल्ह्यात अपुèया पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्रात रोवणी प्रक्रियाही होऊ शकली नाही. गेल्या ४ दशकात पहिल्यांदाच अशी परिस्थिती उद्भवली आहे. शासनाकडून जिल्हा दुष्काळग्रस्त करण्याची अपेक्षा असताना अद्यापही ती पूर्ण होऊ शकली नाही. केवळ तीन तालुक्यात अल्पशा दुष्काळाची घोषणा करण्यात आली आहे. त्यात अर्जुनी-मोर तालुक्याचा समावेश नाही. त्यामुळे तालुक्यात असलेल्या उपलब्ध जलसाठ्यातून शेतकèयांना उन्हाळी धान पीक दिल्यास निश्चितच खरीप हंगामाचे नुकसान भरून निघण्यास मोठी मदत होणार आहे. दरवर्षी तालुक्यात १० हजार ५९० हेक्टर कृषी क्षेत्रात उन्हाळी धान पिकाची लागवड होत असते. यामुळे शेतकरी व शेतमजुरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होवून शहराकडे पलायन करण्याची आवश्यकताही राहत नाही. तालुक्यात ७० ग्रामपंचायती व एक नगरपंचायत मिळून १६० गावे व वाड्यात आहेत. तामुळे १०८ गावांमध्ये स्वतंत्र पाणीपुरवठा योजना व २५ गावांमध्ये सोलर पंपांच्या योजना कार्यान्वित आहेत. धान पिकाला ७५० मिमी. पावसाची गरज असताना यंदा तालुक्यात ९५९ मिमी. पावसाची नोंद झाली असल्याची प्रशासनाकडे आकडेवारी आहे. विभागीय भूजल सर्वक्षणानुसार तालुक्यातील भूजल पातळीही समाधानकारक आहे. असे असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार २२ नोव्हेंबर रोजी तहसीलदार अर्जुनी-मोर व १७ नोव्हेंबर रोजी खंडविकास अधिकारी यांनी पत्र पाठवून तालुक्यात उन्हाळी धान पीक घेण्यास मज्जाव केला असून त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जाहीर नोटीसही लावण्यात आले आहेत. त्यामुळे जलसाठा उपलब्ध असूनही शेतकरी द्विद्धा मनस्थितीत आहेत.  त्यानुसार जिल्हाधिकाèयांनी याकडे विशेष लक्ष देवून तातडीने शेतकèयांना उन्हाळी धान पीक लावण्यात परवानगी द्यावी अन्यथा संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त करून शेतकèयांना आर्थीक मदत करावी अशी धान उत्पादक शेतकरी संघटनेद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देणाèयामध्ये सेवानिवृत्त कृषी अधीक्षक मनोहर चंद्रिकापुरे, जि.प. सदस्य गंगाधर परशुुरामकर, जि.प. सदस्य किशोर तरोणे, बन्सीलाल लंजे, लोकपाल गहाणे, ललित बाळबुद्धे, अश्विन नाकाडे, देवाजी लंजे, गोपीनाथ लंजे, कवडू गाडेगोणे, लक्ष्मण सोनवाने, महादेव रामटेके, मोहन झोडे, लेकराम कापगते, शालीकराम नाकाडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.