बाबासाहेबांच्या विचाराचे अनुकरण करा – खा. नाना पटोले 

0
5

भंडारा,दि. 6 :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता व बंधुता हे विचार आपल्याला दिले आहेत. या विचाराचा अंगिकार केल्यास खऱ्या अर्थाने मानव जातीचा विकास होईल. आज बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांचे विचाराचे अनुसरण केल्यास त्यांना हीच खरी श्रध्दांजली ठरेल असे मत खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, भंडाराच्या वतीने आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिसर, त्रिमुर्ती चौक , भंडारा येथे ही अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी समितीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त खासदार नाना पटोले यांनी बाबासाहेबांना अभिवादन करुन पुष्प अर्पण केले. याप्रसंगी बोलतांना पटोले म्हणाले की, बाबासाहेबांनी विचाराची लढाई लढली आणि त्यांच्या विचाराचा विजय झाला. ज्या दिवशी विचाराची लढाई संपेल त्या दिवशी संविधान संपेल. हा मुलमंत्र उराशी बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले.
बाबासाहेब आंबेडकर यांनी सदैव ग्रंथाचे व पुस्तकाचे महत्व विषद केले. भंडारा जिल्हयात मोठे वाचनालय नाही. शासनाच्या डावी-कडवी विचारसरणी निधीमधून भंडारा येथे भव्य व सुसज्ज वाचनालय उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास अनेक नागरिक उपस्थित होते.