मानव विकास मधून ५ हजार विद्यार्थिनींना मिळणार सायकल

0
11

गोंदिया,दि.6 :  मानव विकास कार्यक्रमातंर्गत इयत्ता 8 ते 12 वीत शिक्षण घेणार्या जिल्ह्यातील  ५ हजार ३२८ विद्यार्थिनींना शंभर टक्के अनुदानावर सायकल वाटप करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्याला १९ लाख ९८ हजार रुपये असे एक कोटी ५९ लाख ८४ हजार रुपये शिक्षणाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहे.या विद्यार्थ्यांची यादी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तयार केली असून लवकरच गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फेत सायकलचे वाटप केले जाणार आहे.
ज्या विद्यार्थिनीच्या घरांपासून शाळेचे अंतर ३ कि.मी. किंवा त्यापेक्षा अधिक आहे. त्या विद्यार्थिनीना शाळेत ये-जा करण्यासाठी शासनाने मानव विकास कार्यक्रमांतर्गत शंभर टक्के अनुदानावर सायकल देण्याची योजना सुरु केली आहे.२०१७-१८ या वर्षात जिल्ह्यातील ५ हजार ३२८ विद्यार्थिनींना योजनेचा मिळणार आहे. एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, त्यांच्या शैक्षणिक मार्गातील अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहे. यासाठी इयत्ता ८ ते १२ वीच्या गरजू विद्यार्थिनीना सायकल वाटप करण्याकरिता मानव विकास कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यासाठी एक कोटी ५९ लाख ८४ हजार रुपयांचा निधी माध्यमिक शिक्षणाधिकारी गोंदिया यांना देण्यात आला आहे. आठही तालुक्याला प्रत्येकी ६६६  सायकलचा लाभ देण्यात येणार आहे.