सौंदड येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम व एकोडीत वृक्षारोपण

0
16

सौदंड,दि.७ःः- हजारो वर्षांपासून धार्मिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक गुलामीमध्ये जगणार्या समस्त बहुजन समाजाला मान,सन्मान व स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी संविधानाच्या माध्यमातून मानवी हक्क अधिकार मिळवून देणारे भारतीय घटनेचे निर्माते, स्त्रीयांचे कैवारी,जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ, संसदपटू डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना 61 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. रेल्वे स्टेशन सौंदड व ग्रामीण रूग्णालय सौंदड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतीमेला विनम्रन माल्यार्पण करण्यात आले.तसेच युवारत्न संघटनेच्यावतीने  विहारात, वाचनालय , तथा अभियान अंतर्गत सोनका पळसगाव येथे पुस्तके वितरण करण्यात आले.यावेळी विवेकानंद राऊत ,समाधान बडोले, आषिश राऊत, व युवारत्न संघटनेचे कार्यकर्ते  उपस्थित होते.

पिंपळाचे झाड लावून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

एकोडीः-  बौद्ध उत्सव समिती च्या वतीने राष्ट्रनिर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन पिंपळाचे झाड लावून अभिवादन करण्यात आले.या वेळी उत्तम गजभिये गुरूजी, किशोर गेडाम गुरूजी, शंकर पेशने, किरणकुमार मेश्राम माजी उपसरपंच,राजेशकुमार तायवाडे तंमुस अध्यक्ष,पुरण दरवडे, नत्थु चौरे, सुरेश बाळणे, बोदेले गुरूजी, दिंगबर सांगोडे, आनंद चिमणकर, अशोक मेश्राम, सचिन दरवडे, विशाल मेश्राम, सुदाम रिणायत, जगन्नाथ बिसेन,दिलीप सांगोडे, सुभाष मेश्राम व शाळकरी मुले उपस्थित होते.