पाथरीच्या शाळेसाठी १0.५ लाखांचा निधी

0
13

गोंदिया :खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आदर्श ग्राम विकास योजनेअंतर्गत दत्तक घेतलेल्या गोरेगाव तालुक्यातील पाथरी या गावाच्या विकासाला आता सुरूवात झाली आहे. या गावातील प्राथमिक शाळेच्या कंपाऊंड व स्वच्छतागृहासाठी आ.राजेंद्र जैन यांच्या स्थानिक विकास निधीतून १0 लाख ५0 हजार रुपये मंजूर करण्यात आले.
खा.पटेल यांनी गेल्या २७ डिसेंबर २0१४ रोजी जिल्ह्यातील प्रमुख अधिकार्‍यांच्या उपस्थितीत पाथरी येथे सभा घेऊन गावकर्‍यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या होत्या. यावेळी त्यांनी पाथरीच्या संपूर्ण विकासासाठी मास्टर प्लॅन तयार करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिला होता. त्यानुसार प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यापूर्वी आ.जैन यांनी अधिकार्‍यांना घेऊन पाथरी येथे काय काय करण्यासाठी वाव आहे याचा आढावा घेतला होता. त्यानुसार या गावाच्या कोणकोणत्या प्राथमिक गरजा आहेत याची यादीच आ.जैन यांनी तयार केली आहे. त्यानुसार त्यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून शाळेच्या कंपाऊंड वॉल आणि स्वच्छतागृहासाठी निधी मंजूर केला. जिल्हाधिकारी कार्यालयाने त्या कामाला प्रशासकीय मान्यताही दिली आहे.