महात्मा गांधी तंटामुक्त जिल्हा संघटनेचे आमदार रहांगडालेंना निवेदन

0
9

गोंदिया,दि.09ः- महात्मा गांधी तंटामुक्त संघटना जिल्हा गोंदियाच्या वतीने संघटनेच्या मांगण्या पुर्ण करण्यासाठी आमदार विजय रहांगडाले यांना निवेदन देण्यात आले.११ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुद्दे उपस्थित करून संघटनेच्या मांगण्या पुर्ण करण्याचे आश्वासन आमदार रहागंडाले यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.

१५ आगस्ट २००७ रोजी संपुर्ण महाराष्ट्रात तत्कालीन गृहमंत्री स्व.आर. आर. पाटील यांनी तंटामुक्त गाव समितीची स्थापना करुन गावात शांतता व गावातील भांडणे गावात कशा प्रकारे सोडविता येईल यावर भर दिला होता.ज्यामुळे जनतेच्या पैशाची व वेळेची बचत होईल हा या मागचा मुख्य उद्देश होता.तो पुर्ण  झाला परंतु समितीला काही समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शासनाला तंटामुक्त समितींकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे.समितीचा कार्यकाळ पाच वर्षाचा करण्यात यावे, पुरस्कार निधी खर्च करण्याचा अधिकार समितीला देण्यात यावे, समिती अध्यक्षला सरपंचा​ प्रमाणे अधिकार देण्यात यावे, अध्यक्षाला दर महिन्याला तीन हजार व सदस्याला एक हजार रुपये मानधन देण्यात यावे, समितीला कार्यालयीन खर्चासाठी वार्षिक १२ हजार रुपये देण्यात यावे, तंट्याचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र इमारत ग्रामपंचायतने उपलब्ध करुन द्यावे, अध्यक्षला जाती प्रमाणपत्र, विशेष कार्यकारी दंडाधिकारी, समितीला वर्षातून एकदा आमसभा ठेवण्याचे देण्याचे अधिकार देण्यात यावे, ग्राम सुरक्षा दल अध्यक्षाला तीन हजार रुपये व ग्राम सुरक्षा दल सदस्याला एक हजार रुपये मानधन देण्यात यावे, ग्राम सुरक्षा दल सदस्यांना सुरक्षाच्या दुष्टीने साहित्य खरेदी करून देण्यात यावे अशा मांगण्याचे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेशकुमार​ तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार विजय रहांगडाले यांना देण्यात आले.यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष श्रावण बरियेकर, सचिव मुमताज अल्ली सैय्यद, कार्यकारी अध्यक्ष हमजाभाई शेख, कोषाध्यक्ष विनोद बरेकर, सदस्य चुन्नीलाल बिसेन, माजी सैनिक सुरेश भगत, विष्णू दयाल बिसेन, जितेंद्र कावळे तेजराम पटले महाराज व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.