श्रमिक वर्गाची एकजुट तोडण्याचा शासनाचा डाव

0
6

गडचिरोली दि. ९– श्रमिक वर्गाची एकजूटता कशी तुटेल, याचे डावपेच शासन खेळत असल्याचा आरोप आज आयोजित पत्रकार परिषदेतून राज्य सरचिटणीस तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक थुल यांनी केला. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महासंघाच्या राज्य कार्यकारिणी सभेचे आयोजन स्थानिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात करण्यात आले होते. या आयोजित सभेच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, कार्याध्यक्ष डी. सी. खारोडे, राज्य ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष एकनाथ ढाकणे, महासंघाचे उपाध्यक्ष नंदकिशोर ठाकूर, पी.जी.शहारे,शैलेष बैस,जे.एच.भोयर,गडचिरोली संघटनेचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे आदी उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना चिलबुले सांगितले की, अखंडतेला विक्षोपीत करण्याचे काम शासन करीत आहे. शासनाच्या कर्मचाºयांच्या विरोधात अनेक कायदे काढून कर्मचाºयांचे तोंड पुसण्याचे काम केले आहे. यामध्ये कंत्राटदार कर्मचारी देखील अडकलेला आहे, त्यामुळे विविध क्षेत्रातील श्रमिक वर्गाने एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. पुढे अशोक थूल म्हणाले की,  देशाच्या नियोजनात सामान्य माणूस केंद्रस्थानी नाही, असे धोरण स्पष्टपणे दिसून येत आहे. कुटुंब कल्याण विस्ताराच्या कार्यक्रमात १९६६  पासून राबणाºया महिला परिचारकांचे पगार १ हजार २०० रूपयापर्यंत पोहोचलेला आहे. परंतु त्यांच्या कामाचे मुल्यमापन करून शासनाने त्यांना किमान वेतन तरी द्यावे, अशी मागणी पत्रकार परिषदेतून थुल यांनी केली.