28.2 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ ग्रामसेवकांचे कार्य उल्लेखनिय – खा. अशोक नेते

ग्रामसेवकांचे कार्य उल्लेखनिय – खा. अशोक नेते

0
23

गडचिरोली दि. ९- ग्रामसेवकांचे कार्य हे उल्लेखनिय असे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी केले. जिल्हास्तरीय ग्रामसेवक मेळाव्याचे आयोजन आज सुप्रभात मंगल कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक थूल, कमलेश बिसेन, एकनाथ ढाकणे, प्रशांत जामोदे, शालीक माहुलीकर, रूपेश निमके, रतन शेंडे, कविश्वर बनपूरकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना चिलबुले म्हणाले की, राज्यात ग्रामसेवकांना अनेक प्रकारचे शासनाच्या विविध योजना राबविण्याकरिता आदेश देण्यात येतो, मात्र या योजना तळागाळात पोहोचविण्याकरिता ग्रामसेवक कोणतीही पर्वा न करता काम करीत असतो. मात्र याचा मोबदला शासनाच्यावतीने दिल्या जात नाही. एकावर एक विविध विभागाच्या नवनवीन योजना ग्रामसेवकांच्या माथी मारण्याचे काम शासन करत असतो. यामुळे आजचा ग्रामसेवक मोठ्या अडचणीत सापडला आहे, अशा विविध समस्यांवर मात करण्यासाठी संघटनेला बळकट करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

blank