शेवटच्या माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करू

0
16

पवनी दि.१०: पवनी – उमरेड, पवनी कऱ्हांडला अभयारण्यासोबत काही प्रश्न निर्माण झाले आहे, ते प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी पुढाकार घेतो, अशा प्रकारे खापरी येथील पुनर्वसणाचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले. यापुढेही शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत राहू असे प्रतिपादन आमदार परिणय फुके यांनी केले.
खापरी महोत्सवात कृती समितीच्यावतीने प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावला म्हणून आमदार फुके यांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी फुके यांनी, प्रकल्पग्रस्त खापरी अभयारण्यात येऊन ठेवल्याने समस्या गंभीर झाली.
या विषयावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून भूसंपादन कायद्यानुसार सरळ खरेदी करण्याचे ठरले आहे. याबाबत ३ नोव्हबरेला पुनर्वसन अधिकारी विजय भाकरे यांनी भूसंपादन कायद्यानुसार जमिन व घरांची सरळ पद्धतीने खरेदी करून व ही प्रक्रिया तीन ते चार महिन्यामध्ये पूर्ण करू असा आदेश काढला.
प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे रामभाऊ बांते व डॉ सुनील जीवनतारे यांच्या पुढाकाराने शाल श्रीफळ व मानचिन्ह देऊन आमदार फुके यांना गौरविण्यात आले.
याप्रसंगी ग्रामपंचायत खापरीच्या सरपंच लक्ष्मीबाई ठवकर, नेरला ग्रामपंचायत सरपंच नितीन कोदाणे, उपसरपंच विठ्ठल नारनवरे, ग्रा. प. सदस्य पांडुरंग कबेट, रेश्मा रेहपाडे, ज्योती बागडे, शारदा रेहपाडे, पुंडलिक भोयर यांनी भाजपात प्रवेश केला.
या कार्यक्रमाला भाजप जिल्हा महामंत्री प्रशांत खोब्रागडे, नागपूर मनपाचे नगरसेवक पिंटू झलके, अ‍ॅड. महेंद्र गोस्वामी, हरीष तलमले, तिलक वैद्य, राजेंद्र फुलबांदे, अमोल तलवारे, दत्तू मुनतीवार, मुख्याध्यापक अशोक पारधी, मयुर रेवतकर, लोकेश गभणे, मनोज शेंडे, गुलाब शिंधिया, महादेव शिवरकर, मनोहर मेश्राम, प्रकाश रेहपाडे बबलु वाघमारे, अतुल भुरे, संकुल सहारे, प्रतीक हटवार, सचिन सहारे, पुरुषोत्तम वाडीभस्मे, मुकळन वाडीभस्मे, रामरतन वैद्य, जयपाल गजभिये उपस्थित होते.
संचालन संजय भोवते यांनी केले. तर प्रास्ताविक डॉ. सुनील जिवनतारे यांनी केले. आभार प्रदर्शन एस. डी. चेटूले यांनी मानले. सत्कार समारंभासाठी खापरी, परसोडी, गायडोंगरी, निमगाव व चिचखेडा गावातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.