जुन्या पेंशनसाठी नागपूर विधीमंडळावर महाआक्रोश मुंडण मोर्चा

0
6

गोंदिया,दि.१२- महाराष्ट्र सरकारने १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त होणाèया कर्मचाèयांना जुनी १९८२ व १९८४ ची पेन्शन योजना बंद करून अन्यायकारक डीसीपीएसयोजना सुरू केली.त्याविरुद्ध जुनीच पेन्शन लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटनेचे महाराष्ट्रातील हजारो कर्मचारी नागपूर विधिमंडळावर महाआक्रोश मुंडण मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.२००५ नंतर नियुक्त होणाèया सर्व कर्मचाèयाना जुनीच १९८२ व १९८४ ची निवृत्तीवेतन योजना लागू करावी.मृत कर्मचारी च्या कुटुंबाला केंद्र शासनाच्य धर्तीवर जुन्याच कुटुंब निवृत्तीवेतन योजनेचा लाभ तात्काळ देण्यात यावे.२००५ नंतर नियुक्त होणाèया कोणत्याही कर्मचाèयावर वेतन ,वेतनवाढव सेवाविषयक अन्याय करणारे शासन निर्णय रद्द करावे व असे कोणतेही निर्णय शासनाने लादू नये अशा विविध मागण्या संघटनेने केल्या आहेत.या मोच्र्यात राज्यभरातून हजारो कर्मचारी येणार आहेत व सरकारी धोरणाविरोधात प्रतीकामक मुंडण करून आंदोलन करणार अशी माहिती संदिप सोमवंशी यांनी दिली आहे.सदर महाआक्रोश मुंडण मोच्र्याला जास्तीत जास्त संखेने कर्मचार्यांनी उपस्थित रहावे.आसे आह्वाहन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर ,आशुतोष चौधरी ,जयेश, लिल्हारे ,कु. निराशा शंभरकर , संदीप सोमवंशी, चंदू दुर्गे , लीकेश हिरापुरे ,जिल्हाध्यक्ष आशिष रामटेके, सचिव सचिन राठोड ,प्रवीण सरगर , मुकेश रहांगडाले ,हितेश रहांगडाले, राज कडव, जितु गणवीर, सौरभ ठाकूर, हितेश डोंगरे, मनोज गोंडाणे, किशोर नवखरे, सदाशिव पाटील, सुनील राठोड, सुभाष सोनवणे, महेंद्र चौहान, भूषण लिल्हारे, शीतल कनपटे, सचिन धापेकर, संतोष रहांगडाले, जीवन म्हसाखेत्री, हुमेंद्र चांदेवार , शालिक कठाने,संजय उके यांनी केले आहे .