आणि मुले वडिलाच्या पेन्शनसाठी मुंडण करून आक्रोश व्यक्त करतात तेव्हा

0
5

गोंदिया,दि.15ः-शासनाने सामान्य कर्मचार्याची हक्काची जुनी पेन्शन योजना बंद करून कोणताही कायदा न करता खाजगीकरणाला चालना देणारी नवीन परिभाषित पेन्शन योजना सुरु करून असंख्य कर्मचार्यांच्या जीवनाशी खेळ केला आहे. या योजनेचा विरोध सर्वच स्तरातून होत आहे,मागील तीन वर्षापासून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटन तर्फे नागपूर विधी मंडळावर आक्रोश मोर्चा, मुंबईत आर्थिक अधिवेशनावर धडक मोर्चा व मागील वर्षी नागपूर येथे विधी मंडळावर लाक्षणिक उपोषणात लाखोच्या संखेने कर्मचारी शामिल झाले.
तरीदेखील शासनाने सदर मागणीकडे गांभीर्याने पाहिजे त्या प्रमाणे दखल घेतली नाही म्हणून कर्मचार्यांच्या मनात असंतोष खदखदत आहे. तो असंतोष येणारया १८ डिसेंबर ला नागपूर अधिवेशनावर सर्व कर्मचारी मुंडण करून व्यक्त करणार आहेत. यासाठी सर्व कर्मचारी मुंडण करून मोर्च्यात शामिल होणार आहेत,तर काही विधानसभेसमोर मुंडण करून आक्रोश व्यक्त करणार आहेत. आपल्या वडील व आई च्या जुनी पेन्शन बहालीसाठी मुलेही मुंडण करून आक्रोश व्यक्त करीत आहेत.
१८ डिसेंबर च्या महा आक्रोश मुंडण मोर्च्याला सर्व विभागातील कर्मचार्यांनी मोठ्या संखेने सहभागी व्हावे असे आव्हाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन च्या वतीने राज्याध्यक्ष वितेश खांडेकर,आशुतोष चौधरी,जयेश लिल्हारे,निराशा शंभरकर,आशिष रामटेके,सचिन राठोड,मुकेश रहांगडाले,संदीप सोमवंशी,हितेश रहांगडाले,प्रवीण सरगर,चंदू दुर्गे,राज कडव,किशोर नवखरे,जितु गणवीर,सदाशिव पाटील,शौराभ ठाकूर,तीर्थराज उके, राजेश बावन्कुडे,भूपेंद्र शनवारे,निलेश साखरे, सुनील राठोड,महेंद्र चौहान,सचिन धोपेकर, भूषण लोहारे, शीतल कनपटे, शुभाष सोनवणे, संतोष रहांगडाले,जीवन म्हशाखेत्री यांनी केले आहे.