आयएसओ गोंदिया जि.प.चा भोंगळ कारभार

0
13

गोंदिया,दि.15ः- आयएसओ नामांकन मिळविणारी गोंदिया जिल्हा परिषद आपल्या कामकाजासाठी चांगलीच प्रसिध्द आहे.कामाची गुणवत्ता,प्रामाणिकपणा,पारदर्शकता यासर्व बाबी तपासल्यानंतरच हे प्रमाणपत्र मिळाले नव्हे ते गेल्या पाच सहा वर्षापासून टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नही चालले आहेत.परंतु हे टिकवून ठेवतांना आपण आपल्या कारभाराच्या कार्यशैलीचेही वाभाडे काढत आहोत याचे भान जिल्हा परिषदेला राहिलेले नाही.त्याचे असे की जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला समाजकल्याण विभागाचे कार्यालय आहे.त्या शेजारी मागासवर्ग कक्ष उभारण्यात आले आहे.या कक्षात कागदपत्रांचे गठ्ठे ठेवल्याने तो कक्ष फक्त नामफलकापुरताच हे सिध्द झाले.त्यातही त्या कक्षाची जबाबदारी कुणाकडे आहे हे स्पष्ट लिहिलेले आहे.त्या कक्षाची जबाबदारी समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे आहे.2006 पासून हे कक्ष कार्यान्वित आहे फलकावर.त्या फलकावरील नावे बघितल्यास सर्वच अधिकारी व कर्मचारी आपल्या जागेवरून बदलून इतर विभागात गेेले आहेत.त्यातच समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम यांना जिल्हा परिषदेतून जाऊन दोन वर्षाच्या वरचा काळ लोटत आहे.पी.जी.शहारे गोरेगावला,जी.एस.पवार शिक्षण विभागात,लोहबरे अर्जुनी मोरगावला,जनबंधू सडक अर्जुनीला असे सर्वच कर्मचारी गोंदिया जिल्हा परिषदेतून बदलून पंचायत समिती स्थळावर गेल्यानंतरही त्या फलकास बदलविण्याचे सौजन्य विद्यमान प्रभारी समाजकल्याण अधिकारी रामटेके यांना दाखविता आले नाही.यावरुन रामटेके आपल्या कामात किती व्यस्त आहेत की त्यांना या फलकाकडे बघायला सुध्दा लक्ष नाही अशी म्हणण्याची वेळ आली आहे.त्यामुळे विरोधी पक्षाचे  व सत्तधारी पक्षाचे सदस्य आजच्या सर्वसाधारण सभेत याकडे लक्ष वेधतात की गप्प बसतात बघायला मिळणार आहे.