व्यसनमुक्तीसाठी तरूणांनी काढली रॅली  

0
10
आमगाव : आजघडीला समाजाला व्यसनाची किड लागली आहे. या व्यसनाच्या आहारी तरूणवर्ग जात असल्याने त्या तरूणांना संदेश देण्यासाठी तसेच व्यसनाच्या आहारी विद्यार्थ्यांनी जाऊ नये यासाठी पदमपूर येथील तरूणांनी गावात व्यसनमुक्ती रॅली काढली. या रॅलीत जनजागृती करणारे विविध फलक, बॅनर सोबत घेण्यात आले होते.
यशोदा व उडाण बहुउद्देशिय विकास संस्था पदमपूर, भवभूती युवा संघटन व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पदमपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या व्यसनमुक्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक शरद उपलपवार, सार्वशिक्षा अभियानाचे अभियंता डी.के. ठाकरे यांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून शाळेतून रॅलीला सुरूवात करण्यात आली. यावेळ अतिथी म्हणून पदवीधर शिक्षक ई.एफ. देशमुख, एल.सी. चौधरी, एस.बी. तुरकर, एन.आर. भांडारकर, एस.व्ही.अग्नीहोत्री, एस.डी. मच्छीरके, जी.टी. तुरकर, एम.वाय.कटरे, नागपुरे, शंकर काटेखाये, हुखरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विज ब्राम्हणकर उपस्थित होते. रॅलीत गावातील तरूण व शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी व्यसनमुक्तीचा संदेश देणारे स्लोगन व घोषणा विद्यार्थ्यांनी देऊन गावात जनजागृती केली. रॅली शाळेतून तुकडोजी चौक, गाडगेबाबा चौक, हनुमान मंदिर चौक होत छोट्या गल्लीतून तुकडोजी चौकात परतली. पुन्हा चांदसुरजटोली येथे भ्रमण करीत रॅली शाळेत परतली. रॅलीचे संचालन नरेश रहिले यांनी केले. रॅलीच्या आयोजनसाठी अतुल फुंडे, प्रेमानंद पाथोडे, आशिष तलमले, राकेश नेवारे, मुकेश भोंडे, दिनेश डोये, शाहरूख पठाण, विश्वजीत नागरिकर, गोविंद बहेकार, निलेश बोहरे, आशिक वाढई, राहूल कांबळे, प्रकाश चोपकर, ओमप्रकाश चोपकर, प्रविण भोंडेकर, प्रिनल वंजारी, सचिन तलमले, कुलदीप हुकरे, मुकेश भोंडे, लोकेश आगाशे, विनय चंद्रीकापुरे, महेंद्र  गिºहेपुंजे, सुरज रहिले, मुकेश शिवणकर, दिनेश गिºहेपुंजे, गणेश गिºहेपुंजे, मेहश काटेखाये, प्रदीप कावरे, शंकर कोरे यांनी सहकार्य केले.