पदमान्यता त्वरित देऊन वेतन सुरू करा

0
6

नागपूर,दि.19 – महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या १२३ शाळा व कर्मशाळांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाकडून त्वरित पदमान्यता देऊन वेतन सुरू करा या मागणीसाठी शिक्षकांनी विधानभवनांवर धडक दिली. दिव्यांगांच्या शाळांवरी शेकडो शिक्षक, शिक्षिकांनी शासनाविरुद्ध निदर्शने केले. आक्रमक झालेल्या मोर्चाने जोपर्यंत शासन पदमान्यता देणार नाही, वेतन सुरू करणार नाही तोपर्यंत माघार न घेण्याचा निर्णय घेतला. शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मोर्चाला मार्गदर्शक म्हणून पाठिंबा दिला होता. मोर्चाला सकाळी ११ वाजता यशवंत स्टेडियमजवळून सुरुवात झाली. मोर्चा श्रीमोहिनी कॉम्प्लेक्‍स मार्गावर अडविला. ८ एप्रिल २०१५ मध्ये शासनाने दिव्यांगांच्या १२३ शाळांना मान्यता देऊन कर्मचाऱ्यांना वेतन सुरू करण्यासंदर्भात निर्णय दिला होता. जितेंद्र पाटील, मारोती भोयर, मंगेश मुसळे, अविनाश चिरकेकर, प्रतीक व्यवहारे, स्नेहदीप जैन, वैशाली कडू, भारती मानकर, मनीषा इंगळे यांनी मार्चाचे नेतृत्व केले. जोपर्यंत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले मोर्चास्थळावर येऊन भेट घेणार नाही, तोयर्पंत मोर्चास्थळ न सोडण्याची भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली होती.