श्याम इंटरप्राईजेसचा ऑक्सीजन पुरवठा परवाना रद्द

0
7

गोंदिया,दि.20- उत्तरप्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यातील ऑक्सिजनअभावी झालेल्या ६२ मुलांच्या मृत्यूने सर्वत्र हाहाकार माजलेला असताना मध्यप्रदेशातील लांजीचे माजी आमदार आणि बसप नेते किशोर समरिते यांनी अशा घटनेची गोंदिया व बालाघाट जिल्ह्यात पुनरावृत्ती होऊ शकते, असा गौप्यस्पोट करीत गोंदियातील श्याम इंटरप्राईजेसच्यावतीने तयार करणञयात येणारे ऑक्सीजन सिलेंडर अवैध असल्याची तक्राार केल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली होती. त्या तक्रारीच्या आधारावर अन्न औषध विभागाचे निरीक्षक मनिष गोतमारे यांच्या मार्गदर्शनात शाम इंटरप्राईजेस कंपनीची चौकशी व सिलेंडर निर्माण करणाèया कवलेवाडा मार्गावरील कारखाण्याची तपासणी केल्यावर नियमांना उल्लघंन व अनेक रत्रुट्या आढळून आल्या. त्यामुळे शाम इंटरप्राईजेस मेडीकल ऑक्सीजन निर्माण करणाèया या कंपनीचा परवाना औषधी व सौंदर्य प्रसाधन नियमाचा उल्लघंन केल्याप्रकरणी रद्द करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त औषधी एम.जी. केकतपुरे रद्द करण्यात आल्याचे सांगितले.
माजी आमदार समरिते यांनी केलेल्या तक्राारीनुसार गोंदिया व बालाघाट जिल्ह्यातील काही रुग्णालयांसह खासगी व्यावसायिकांना लिक्विड ऑक्सिजन सिqलडरचा पुरवठा करण्याचे काम गोंदियातील श्याम इंटरप्रायजेस या कंपनीकडे आहे. वास्तविक, या कंपनीत ऑक्सिजन सिqलडर पुरवठा करण्यासोबतच रिफिलींगसाठी आवश्यक असलेला तांत्रिक कर्मचारी वर्ग कायद्यानुसार असायला हवा. परंतु, माहितीच्या अधिकारात मिळविलेल्या माहितीमध्ये प्रशक्षित व रासायनिक पदार्थांचा ज्ञान असलेला व्यक्ती त्याठिकाणी कार्यरत नसल्याचे उघडकीस आले.
नरेश शाहू नामक व्यक्ती ही गोंदियाच्या श्याम इंटरप्रायजेसमध्ये नोकरी न करता छत्तीसगड राज्यातील भिलाई येथील अतुल ऑक्सिजन प्रायवेट लि.कंपनीत नोकरीवर आहे. त्या व्यक्तीच्या कागदपत्रांच्या आधारावर गोंदियात ऑक्सिजन रिफिqलगचे काम केले जात असून हा प्रकार अवैध असल्याचे समरिते यांनी म्हटले होते. त्यांच्या तक्रारीवर व विविध वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांच्या आधारावर अन्न औषध प्रशासन विभागाने फॅक्टरीत जाऊन पाहणी केल्यावर फॅक्टरी नियमांचे उल्लघंन केल्याचे दिसून आले. चौकशी दरम्यान केमीकल इंजिनीअर व मेकॅनीकल इंजिनिअर नरेशकुमार व वर्षा गुप्ता गैरहजर होते. नरेशकुमार भीलाई येथील कंपनीत कार्यरत असल्याचे चौकशी दरम्यान समोर आले. त्यातच तपासणी दरम्यान लागणारे कागदपत्र व ऑक्सीजन परीक्षण अहवाल सादर न केल्याने आधिच विभागाने नोटीस दिले होते. त्या नोटीसाला दिलेली उत्तर ही असमाधानकारक असल्याने व नियमांचे पालन करण्यात उदासिनता दाखविल्याने परवाना रद्द करण्यात आला आहे.