आमच्या हक्काच्या पैशासाठीच अधिकाèयांना का पडते ‘हेड’ची गरज

0
8

गोंदिया,दि.20: गोंदिया जिल्हा परिषद म्हटले की विविध प्रकारे चर्चेत असते. पदाधिकारी असो की अधिकारी आपला आर्थिक उद्धार करण्यासाठी नवनव्या युक्त्या शोधत असतात. परंतु चतुर्थ,तृतीय श्रेणीतील कर्मचाèयांना त्यांच्या हक्काचा पैसा देण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा मात्र हेच अधिकारी कुठल्या हेडमधून तुझे बिल मंजूर करू असा प्रश्न उपस्थित करून त्या कर्मचाèयाची बोळवण करतात. परंतु आपल्याच कार्यालयातील नियमबाह्य बैठकांच्या पाट्र्यावर म्हणा qकवा जे ऑडिटर ऑडिट करायला येतात. त्यांच्यावर जेव्हा हजारो रुपयाा खर्च केला जातो. तेव्हा मात्र या अधिकाèयांना हेडची गरज पडत नाही. अशी खोचक प्रतिक्रिया देत एका चतुर्थ कर्मचाèयाने आपल्या मनात दडलेल्या भावनांना वाट मोकडी करून दिली.
जिल्हा परिषदेतील एका चतुर्थ श्रेणी कर्मचाèयाचे काही देयके मंजूर करावयाचे होते. त्यासाठी त्याने आपली देयके अधिकाèयाकडे सादर केली. तेव्हा ती ५ हजाराची देयके मंजूर करण्याकरिता कुठल्या हेडमधून तुझे बिल मंजूर करायचे असा प्रतिप्रश्न करून त्या कर्मचाèयाला निरुत्तर केले गेले. त्याच कर्मचाèयाने मात्र जो अधिकारी कुठलीची चौकशी न करता शाळा-महाविद्यालयाच्या व्हिजिट बूकवर स्वाक्षरी करून परत येतो. त्यासोबतच जिल्हा परिषदेच्या इमारतीचे तुकडे पाडून रंगरंगोटी केली जाते. पदाधिकाèयांचे कक्षाची तोडफोड करून स्वार्थ साधला जातो. तर म्हणे गेल्या काही दिवसातच बोदलकसा येथे झालेल्या जिल्हा परिषदेच्या एका विषय समितीच्या बैठकीच्या पार्टीवर दारू, मटनसाठी १६ ते १८ हजार उडविले गेले. तर अध्यक्ष महोदयांच्या शासकीय वास्तूच्या प्रवेश जेवणासाठी १६ ते २० हजाराचा खर्च केला गेला. आणि जे ऑडिटर ऑडिट करायला येतात. त्यांना ४० हजार रुपये मोजून दिले जातात. हा पैसा खर्च करताना त्या अधिकाèयाला हेडची गरज पडत नाही. आणि माझ्या हक्काच्या ५ हजारासाठी मात्र हा अधिकारी हेड विचारतो आच या आयएसओ जिल्हा परिषदेचा पारदर्शकपणा म्हणावा का?