सी-६० जवानांसाठी अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

0
9

गडचिरोली दि.२२:- जिल्ह्यातील विशेष अभियान पथकातील जवानांसाठी अत्याधुनिक अशा प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन अव्वर मुख्य सचिव (गृह) सुधीर कुमार श्रीवास्तव, पोलिस महासंचालक सतीश माथूर यांच्या हस्ते आज २२ डिसेंबर रोजी आरमोरी तालुक्यातील किटाळी येथे करण्यात आले.

यावेळी अप्पर पोलिस महासंचालक (नक्षल विरोधी अभियान) शरद शेलार, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक (अभियान) महेश्वर रेड्डी, अहेरीचे अप्पर पोलिस अधीक्षक राजा रामा सामी, अप्प्र पोलिस अधीक्षक (प्रशासन) महेंद्र पंडित उपस्थित होते.
किटाळी येथे उभारण्यात आलेल्या या प्रशिक्षण केंद्रामध्ये एकाच वेळी १०० जवानांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर येथे तीन सुसज्ज फायरबट तसेच रिफ्लेक्स फायरिंग, नाईट फायरिंग, मुव्हींग टार्गेट फायरिंग, हेलीपॅड, प्रशिक्षणार्थींना राहण्यासाठी प्रशस्त इमारत उपलब्ध करून देण्यात आली आहे. याप्रसंगी नक्षल विरोधी अभियानामध्ये अतुलनिय व उल्लेखनिय कामगिरी बजाविणाºया मोतीराम मडावी यांच्यासह १९ जवानांचा सत्कार करण्यात आला. त्यांना अव्वर मुख्य सचिव (गृह) सुधीर कुमार श्रीवास्तव, पोलिस महासंचालक सतीश माथूर यांच्या हस्ते  वेगवर्धीत पदोन्नती प्रदान करण्यात आली. त्यांनी जवानांना मिठाईचे वाटप केले. यावेळी जिल्ह्यातील इतर पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.