शासकीय धान केंद्रावर शेतकर्यांची अडवणूक-जि.प.सदस्य अंबुले

0
10

गोंदिया,,दि.२४ः शासनाच्या हमीभावाचा लाभ मिळावा, यासाठी शेतकरी शासनाच्या आधारभूत धानखरेदी हमीभाव केंद्रावर धान विकत असतो. मात्र काही दिवसांपासून जिल्ह्यातील काही केंद्रावर शेतकर्‍यांनी सातबारा भरूनही त्यांचे धान खरेदी होत नसल्याची बाब गंगाझरी येथील धानखरेदी केंद्रावर सुरू असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार जि.प. सदस्य रमेश अंबुले यांनीच उजेडात आणला असून शासनाने प्रत्येक शेतकड्ढयांचे धान खरेदी करावे, अशी मागणीही केली आहे.
जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने संचालित विविध संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या धानखरेदी केंद्राच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे धान खरेदी केले जाते. ज्या शेतकर्‍यांनी या केंद्रात धानविक्री केले असेल त्या शेतकर्‍यांना बोनसचाही लाभ मिळतो. त्या अनुषंगाने शेतकरी आपला धान शासनाला विकतात. परंतु, मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील काही धानखरेदी केंद्रावर शेतकर्‍यांचे धान पडून आहेत. त्या शेतकर्‍यांना संबधित धानखरेदी केंद्र संस्थकडे सातबारा देवूनही तो धान खरेदी केलेला नाही. या प्रकारामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. ही बाब गंगाझरी केंद्रावर उजेडात आल्याची माहिती जि.प. सदस्य रमेश अंबुले यांनी दिली असून जिल्ह्यातील अशात किती केंद्रावर शेतकर्‍यांची पिळवणूक होत आहे. यावरही शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच शेतकर्‍यांचे संपूर्ण धान कोणत्याही अटी व शर्तीविना केंद्र संचालकांनी घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली