युवकांनी वाचनाची सवय लावावी- सावन डोये

0
7

छाया- लोहारा येथील ग्रंथालयाला ग्रंथसंपदा भेट म्हणून देताना सावन डोये.

देवरी- आधुनिक युगात मोबाईल आणि इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेला आपला युवक वाचनापासून खूप दूर जात आहे. ग्रामीण भागातील ग्रंथालये ओसाड पडली आहेत. त्यातील समाजाला दिशा देऊन दशा बदलवणारी पुस्तके कोठे गेली, याकडे कोणाचेही लक्ष दिसत नाही. वाचनाची सवय तुटणे, ही गंभीर बाब आहे. जो वाचनसंस्कृतीचा सन्मान करेल, तोच या जगात वाचेल. अन्यथा आपला पूर्वेतिहास आपण विसरत जाण्याचा धोका आहे. आपल्या समाजाच्या इतिहासाची जोपासना करावयाची असेल तर युवकांनी वाचनाची सवय लावावी. त्यासाठी प्रत्येकाने आपले किमान दोन तास तरी वाचनालयात घालवावे, असे आवाहन सकाळचे जिल्हा प्रतिनिधी सावन डोये यांनी लोहारा येथे केले.
ते लोहारा येथे मित्र मंडळाच्या सहकार्याने आयोजित सेवानिवृत्त कर्मचाèयांनी सादर केलेल्या एका नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी सिद्धार्थ विद्यालयाचे प्रा. महेंद्र मेश्राम, दिलीप श्रीवास्तव, युवक काँग्रेसचे दीपक पवार, माणिक भंडारी, सुनील शुक्ला, युगेश पवार, सरपंच भोजराज घासले, कमल येरणे, राजकुमार रहांगडाले, पुरण मटाले, प्रदीप परिहार,दीपक फुंडे, अनिल गोखले. Ÿशिवसेनेचे तालुका अध्यक्ष सुनील मिश्रा, इंजि. जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सावन डोये यांनी लोहारा येथील वाचनालयाला ग्रंथसंपदा भेट दिली. या ग्रंथसंपदेचा स्वीकार सरपंच मानकर आणि लोहारा शाळेचे शिक्षक निनावे यांनी केले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.