महात्मा फुले-आंबेडकर साहित्य संमेलन

0
9

गडचिरोली : महात्मा फुले, आंबेडकर विचारमंच गडचिरोलीच्या वतीने १३ फेब्रुवारीला शुकवारी सकाळी ११ वाजता येथील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर महात्मा फुले-आंबेडकर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या संमेलनाचे उद्घाटक म्हणून माजी राज्यमंत्री तथा ब्रह्मपुरीचे आ. विजय वडेट्टीवार तर अध्यक्षस्थानी साहित्यीक प्रा. भाऊ लोखंडे राहतील. विशेष अतिथी म्हणून आ. प्रा. जोगेंद्र कवाडे तर प्रमुख अतिथी म्हणून मारोतराव कांबळे, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल म्हशाखेत्री, व्ही. डी. मेश्राम, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष लालाजी राऊत, नागपूर विद्यापीठाचे शिक्षण शास्त्र विभाग प्रमुख प्रा. भिमराव गोटे आदी मान्यवर उपस्थित राहतील.

या संमेलनादरम्यान आ. विजय वडेट्टीवार, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा रिपाइंतर्फे सत्कार करण्यात येणार आहे. या संमेलनात ‘आंबेडकरी चळवळीची सद्य:स्थिती व आंबेडकरी कार्यकर्त्याची जबाबदारी’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. सायंकाळी गायक अनिरूध्द वनकर यांचा आंबेडकरी जलसा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन मुनिश्वर बोरकर यांनी केले आहे.