सिव्हिल लाईन बोडी सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन

0
9

गोंदिया,दि.29 : गोंदियाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प घेऊन आम्ही सत्तेत आलो. हा संकल्प आम्ही विसरलो नाही. त्याकरिता कटिबद्ध आहोत.काही लोकांनी आम्हाला विकास करण्यापासून रोखण्यासाठी आम्हाला न्यायालयीन प्रकरणात गोवले. 9 महिने त्यात गेले. आम्ही आता पूर्ण ताकदीनिशी शहराच्या विकासाकरिता मैदानात उतरलो आहोत. वर्षभराच्या आत शहर बदललेला असेल. आम्ही शहराचा चेहरामोहरा बद्दलविण्यासाठी कृत संकल्प आहोत, त्याकरिता नागरिकांचे सहकार्य आणि विश्वास हवे असे मत नगर पालिकेचे अध्यक्ष अशोक इंगळे यांनी व्यक्त केले.
नगर पालिकेचे अध्यक्ष अशोक इंगळे यांच्या हस्ते पाहुण्यांच्या उपस्थितीत गुरुवारी सिव्हील लाईन बोडीच्या सौदर्यीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले होते. प्रमुख अतिथी म्हणून बांधकाम सभापती घनश्याम पानतावणे, पाणी पुरवठा सभापती दिलीप गोपलानी, शिक्षण सभापती भावना कदम, नियोजन सभापती मैथुला बिसेन, महिला व बालकल्याण सभापती अनिता मेश्राम, नगरसेवक अफसाना मुजीब पठाण, माजी नगरसेवक सुनीता हेमने, राहुल यादव, पालिकेचे प्रशासकीय अधिकारी सी.ए. राणे, कंत्राटदार श्याम चंदनकर, बांधकाम विभागाचे अधिकारी बाराईकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष हेमंत पटले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने नगर पालिकेच्या निवडणुकीत रस्ते, सौंदर्यीकरण, नाली, शुद्ध पाणी, भूमिगत गटार योजना आदींची कामे करण्याचे आश्वासन दिले होते. पालिकेने कामांचे नियोजन करावे. आमच्यावर मतदारांनी विश्वास दाखवून निवडून दिले. मात्र आम्ही संकल्प पूर्तीसाठी निधी खेचून आणू, नागरिकांच्या मनातील गोंदिया घडविण्याचा आमचा संकल्प आहे, असे पटले म्हणाले.सभापती दिलीप गोपलानी म्हणाले, शहरात 3 नवीन बगीचे, शहरात 3000 led स्ट्रीट लाईट, रस्ते तयार होणार आहेत. चालू आर्थिक वर्षात 60 कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. प्रास्ताविक दीपक कदम,संचालन चंद्रभान तरोने यांनी तर आभार पालिकेच्या सभापती भावना कदम यांनी मानले.यशस्वितेकरिता अजय इंगळे, सतीश चौहान, बबन येटरे, नवरत्न अग्रवाल, मंजले यादव, संजय इंगळे, पुनजी लिलहारे, हासानंद गोपलानी, मनोहर ठाकूर, सुनील तिवारी, पप्पू अरोरा, शैलेंद्र मिश्रा, पंडित नरेंद्र शुक्ल, रमण मिश्रा, मनोज मेंढे, मोती कुरील, किशोर व्यास, प्रल्हाद विश्वकर्मा, पिंकी तिवारी, योगेश गिरीया, कार्तिक यादव, भरत कानोजिया, सुमित तिवारी, राम पुरोहित आदींनी सहकार्य केले.