नक्षलग्रस्त भागात उभारणार २८ टॉवर

0
7

गोंदिया,दि.30 : गोंदिया जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना इंटरनेटच्या सेवेचा लाभ घेता यावा. माहितीचे आदानप्रदान करणे सुलभ व्हावे, नक्षली कारवायांना पायबंद लावण्यास मदत व्हावी, यासाठी नक्षलग्रस्त भागात तीन आणि जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात १५ मोबाईल टॉवर उभारण्यात येणार आहेत. तर यापूर्वी शासनाची मंजुरी मिळालेले १० टॉवर लवकरच उभारण्यात येणार आहे.जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असल्याने शासनाने सन २०१२ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार कालीमाटी, कातुर्ली, टाकरी, लोहारा, पाथरी, मुंडीपार, जमाकुडो, फुक्कीमेटा, डवकी, येडमागोंदी, धाबेटेकडी, भरनोली, नवनीतपूर, बिजेपार, लटोरी, सोनेखारी व धानोरी या १७ ठिकाणी टॉवर उभारण्यात आले आहेत. नक्षलग्रस्त भागासाठी १० टॉवरला शासनाने मंजूरी दिली आहे. त्या टॉवरचे काम सुरू करण्यासाठी ई-निवीदा प्रक्रिया झाली आहे. त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. तर १८ नविन टॉवर उभारण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या १८ पैकी ३ टॉवर जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त भागात तर १५ टॉवर सीमा भागात उभारण्यात येणार आहेत. यासंबंधीचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे. पंतप्रधानांनी कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. मात्र, सुविधांअभावी नागरिक कॅशलेस व्यवहार करण्यास असमर्थ ठरत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मोबाईलला कव्हरेजच राहात नाही. बहुतांश ठिकाणी मोबाईल टॉवर नाहीत.