राष्ट्रवादीच्यावतीने सडक अर्जुनीत हल्लाबोल आंदोलन

0
9

सडक अर्जुनी,दि.30ः  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सडक अर्जुनी शाखेद्वारे २५ डिसेंबरपासून सुरू असलेल्या शेतकरी सन्मान दींडीचा समारोप आज शनिवारी (दि.३0) हल्लाबोल आंदोलनाने सडक अर्जुनी तहसिल कार्यालयासमोर करण्यात आला.या आंदोलनात तालुक्यातील हजारो शेतकरी सहभागी झाले होते.
सडक अर्जुनी तालुका संपूर्ण दुष्काळग्रस्त घोषीत करावा, शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, रोजगार हमी योजनेची कामे मोठय़ा प्रमाणात सुरू करा आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सडक अर्जुनी तालुक्यातील प्रत्येक गावात शेतकरी सन्मान दींडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दींडीदरम्यान, पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणाची माहिती शेतकरी व नागरिकांपर्यंत पोहोचविली व जनजागृतीचे काम केले.
दरम्यान आज शनिवारी (दि.३0) ही दिंडी सडक अर्जुनी येथील तहसिल कार्यालयासमोर हजारोच्या संख्येत पोचल्यानंतर मुख्यरस्त्यावरच जाहिर सभा घेत शासनाच्या धोरणांचा कडाडून विरोध करण्यात आला. या हल्लोबल आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार  राजेंद्र जैन, दिलीप बनसोड, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्‍वरी, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, मनोहर चंद्रीकापुरे यांनी केले.या हल्लाबोल आंदोलनात तालुकाध्यक्ष डॉ.अविनाश काशीवार, गजानन परशुरामकर, जि.प.सदस्य रमेश चुर्‍हे, हिरालाल चव्हाण, आर.टी. शहा, छाया चव्हाण, लक्ष्मण लंजे,रजनी गीरेपुंजे महिला अध्यक्ष, जिवन लंजे,डी.यु.रहागंडाले,नरेश भेंडारकर,मिलन राऊत,देवचंद तरोणे,दिनेश हुकरे, छाया मरसकोल्हे, शिवाजी गहाणे, पुष्पमाला बडोले, शिवाजी रहीले, सिंधुताई मेश्राम, प्रशांत बडोले, हनुमान गडपायले, मुन्ना देशपांडे,उमराव कापगते, राजकुमार राउत,नरेंद्र टेंभुर्णे, जगन वलथरे,छोटेलाल मेश्राम, मोठ्या संख्येने शेतकरी,शेतमजुर सहभागी झाले होते.