अपंग अधिकारी कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी ओ.जे.बिसेन

0
10

गोंदिया,दि.०3- गोंदिया जिल्ह्यातील अपंग गटातील अधिकारी व कर्मचारी यांच्या हक्कासाठी लढणार्या गोंदिया जिल्हा अपंग अधिकारी कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी ओ.जे.बिसेन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा संघटनेची नवी कार्यकारीणी गठित करण्याकरीता विद्यमान जिल्हाध्यक्ष एम.एस.डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली 25 डिसेंबरला निवडणूक घेण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून माजी अध्यक्ष प्रदिप निंबार्ते यांनी काम पाहिले,तर राज्यध्यक्ष दिगंबर घाडगे पाटील विशेष उपस्थति होते. ओ.जे. बिसेन यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत जिल्हाध्यक्षपदावर बिनविरोध निवड करण्यात आली. कार्यकारिणी गठीत करण्यात आली यामध्ये अध्यक्षओ.जे. बिसेन,सचिव बी.जी.डोंगरे,उपाध्यक्ष आर.एम.लिल्हारे,मालती रहमतकर,कोषाध्यक्ष जे.सी.साव कार्याध्यक्षपदी एस.डी.पटले यांची निवड करण्यात आली.