सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त माविमद्वारे महिलांची मोटरसायकल रॅली

0
18

गोंदिया,दि.३ : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयच्या वतीने ३ जानेवारी रोजी नेहरु चौक येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८७ व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, नागपूर विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मतांदा राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, नाबार्डचे सहायक महाप्रबंधक नीरज जागरे, समाज कल्याणचे सेवानिवृत्त प्रादेशिक उपायुक्त अनिल देशमुख, जि.प.माजी सभापती सविता पुराम, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते महिलांच्या उत्पन्नात भर पडावी यासाठी बचतगटातील तुलसी चौधरी, भिमा पटले, शाहिस्ता शेख, अनिता चिखलोंडे, दुर्गा रंगारी, शोभा तावाडे, सुनिता शिवणकर, सत्यशिला भगत या ८ महिलांना मायक्रो एटीएमचे वाटप करण्यात आले. उत्कर्ष लोकसंचालीत साधन केंद्र गोंदिया व स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्र आमगाव यांना आर्थिक मध्यस्थता उपक्रमाकरीता प्रत्येकी २४ लाख रुपयाचे धनादेश देण्यात आले.
पंडीत नेहरु यांच्या पुतळ्याजवळ माविमच्या बचतगटातील महिला तसेच शहरातील महिला व युवतींच्या मोटरसायकल रॅलीला मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. ही रॅली शहरातील मुख्य मार्गावरुन फिरुन नेहरु चौक येथ विसर्जीत झाली. या रॅलीमध्ये ई-व्हेईकलचा सुध्दा समावेश होता. रॅलीतील आकर्षक चित्ररथात सावित्रीबाईच्या वेशभुषेत अनिता बडगे होत्या. कार्यक्रमस्थळी विविध वस्तूंचे विक्री स्टॉल लावण्यात आले होते.
कार्यक्रम व रॅलीच्या यशस्वीतेसाठी सहायक जिल्हा समन्वयक अधिकारी सतीश मार्कंड, लेखाधिकारी योगेश वैरागडे, सहायक नियंत्रण अधिकारी प्रदिप कुकडकर, उपजिविका सल्लागार श्री.बांगरे, श्री.पंचभाई, धनराज बनकर, श्रीमती बिसेन, मोनिता चौधरी, आशिष बारापात्रे यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांनी केले. संचालन शालु साखरे यांनी तर उपस्थितांचे आभार प्रिया बेलेकर यांनी मानले. कार्यक्रम व रॅलीत मोठ्या संख्येने महिला व युवतींचा सहभाग होता.