शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसैनिकांनी केला चक्काजाम

0
8

कुरखेडा, दि.४: दुष्काळ व रोगराईमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत करावी, या प्रमुख मागणीसाठी आज शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांनी कुरखेड्यानजीकच्या आंधळी फाट्यावर चक्काजाम आंदोलन केले.

मागील २-३ वर्षांपासून कधी अतिवृष्टीने, कधी अल्प पावसामुळे, तर कधी रोगराईमुळे धानपिकाचे नुकसान होत आहे. परिणामी उत्पादन खर्चाएवढीही रक्कम हातात येत नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊनही त्यांनी शेतकऱ्यांना भरपाई जाहीर केलेली नाही. दोन दिवसांपूर्वी देसाईगंज व आरमोरी तालुक्यात हेक्टरी ७२०० रुपये मदत जाहीर केली. त्यातही कोरची व कुरखेडा हे तालुके वगळण्यात आले. त्यामुळे सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत करावी, या मागणीसाठी आज शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात आंधळी फाट्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजतापासून दुपारी १ वाजतापर्यंत वाहतूक ठप्प होती. यावेळी शिवसैनिकांनी ‘शेतकरीविरोधी सरकारचा निषेध असो’, असे नारेही लावले. तहसीलदार श्री.चरडे व उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.काळे यांनी आंदोलनस्थळी पोहचून शिवसैनिकांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख निरांजनी चंदेल, कामगार सेनाप्रमुख नरेंद्र तिरणकर, पाणीपुरवठा सभापती पुंडलिक देशमुख, बांधकाम सभापती संतोष भट्टड, विठ्ठल ढोरे, विजय पुस्तोडे, शारदा गाताडे, लोमेश कोटांगले, पुरुषोत्तम तिरगम, दशरथ लाडे, जयराम नैताम, क्रिष्णा पाटणकर, गुणवंत कवाडकर, शामराव तुलावी, रोशन सय्यद, निताराम नाकाडे, फागू तुलावू, सावजी पदा, तेजराम सुकारे, वासुदेव बहेरवार, विनोद डहाके, अर्षद पटेल, प्रभाकर शिवलवार, अनिल उईके, भाग्यवान लांजेवार, धाडू महाजन, कुंवरलाल दाउदसरिया, सेवादास खुणे, यादव नाकाडे, पुरुषोत्तम गाडेगोणे, गुणवंत दडमल, देवनाथ कुथे, सरपंच पोरेटी, उपसरपंच नखाते, वेणूनाथ राऊत, रवींद्र बगमारे, माणिक गावडे, भास्कर कावळे, मुरली नरोटे, शामलाल कुमरे, गुरुदेव खुणे, अंकुश उईके, जीवन ठलाल, जीवन नाट, देवेंद्र मेश्राम, मधुकर निमजे, माधव रणदिवे, भजन सुरपाम, मोहन महाजन, मेसराम दाउदसरे, रेवनाथ रणदिवे, धनंजय मोहुर्ले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.