यश संपादनासाठी आत्मविश्वास आवश्यक- बघेले

0
10

गोेरेगाव,दि.०७: आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेमुळे विद्याथ्र्यांच्या विचार व कार्यशैलीत वाढ होते. स्नेह सम्मेलनाप्रसंगी आयोजित सपर्धेमधचये काही विद्यार्थी यश संपादन करतात. तर काही अपयशी ठरतात. परंतु अयशस्वी विद्याथ्र्यांनी खचू न जाता स्वत:मधील आत्मविश्वास वाढवावा. कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. असे विचार से.वि.प्राचार्य पी.एफ. बघेले यांनी व्यक्त केले. ते पी.डी. रहांगडाले विद्यालय व कन्या क. महाविद्यालय गोरेगाव येथे स्नेहसंमेलनाप्रसंगी बक्षिस वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. याप्रसंगी बक्षीस वितरक म्हणून नगर पंचायत गोरेगावचे उपाध्यक्ष इंजि. आशिष बारेवार उपस्थित होत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र कामगार संगठना पुणेचे संचालक ओंकारलाल शरणागत, रqवद्र बोपचे, रेवाालाल रहांगडाले, निकेश्वरी पटले, मंगला रहांगडाले, नगरसेवक डॉ. रूस्तम येडे, प्राचार्य एच.डी. कावळे, पर्यवेक्षक वाय.आर. चौधरी मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन प्रा.सी.आर. बिसेन यांनी तर आभार एच.टी. बिसेन यांनी मानले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सांस्कृतीक प्रमुख ए.एच. कटरे, एम.डी. रहांगडाले, आर.वाय. कटरे, डी.बी.चाटे यांनी प्रयतन केले. यशस्वितेसाठी प्रा.ज़े.एच. ढाले, यु.डी. पारधी, एस.यू. बारापात्रे, व्ही.डी. चनाप, एस.पी. तिरपुडे, जी.डब्ल्यू. रहांगडाले, आर.टी. पटले, वाय.के. चौधरी, एस.आर. मांडरे, बावनथडे, वाय.के. चौधरी, प्रा.राठोड, प्रा. नंदेश्वर, प्रा.क़टरे, डी.एन. टेंभरे, एस.आर. रहांगडाले, प्रा,कु. ठाकुर, प्रा.भगत, प्रा. बिसेन, प्रा.पटले, आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाèयांनी परिश्रम घेतले.