बायपास रस्त्याच्या वाढीव मोबदल्यासाठी पीडब्लूडी विभागावर जप्तीची नोटीस

0
10

गोंदिया,दि.०८ः-गोंदिया सार्वजनिक बांधकाम विभाग(रोहयो)क्रमांक १ च्यावतीने तयार करण्यात आलेल्या पुर्व बायपास रस्त्यामध्ये गेलेल्या जमीनधारकांना वाढीव मोबदल्याची रक्कम व्याजासह देण्याचे न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरही मोबदल्याची रक्कम न दिल्याने आज जमिनधारकाने न्यायालयाच्या आदेशानुसार जप्तीसाठी बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक दिली.जमीनधारक स्व.देवीदास गोपलानी यांचे उत्तराधिकारी उदय देविदास गोपलानी यांच्यासह २१ जणांना गोंदिया न्यायालयाने वाढीव मोबदल्याची रक्कम देण्याचे आदेश बांधकाम विभागाला २०१६ मध्ये दिले.त्या आदेशानुसार मूळ वाढीव मोबदल्याची रक्कम २५ लाख ५० हजार रुपये व त्यावरील व्याज असा ४४ लाख रुपयासाठी आज गोपलांनी यानी वकील अ‍ॅड.सुमित राजनकर,न्यायालयाचे बेलीप यांच्यासह कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण यांचे कार्यालय गाठले.कार्यकारी अभियंता श्रीमती चव्हाण यांनी आपण शासनाकडे वाढीव मोबदल्याची रक्कम देण्यासाठी पैशाची मागणी अधिक्षक अभियंतामार्फत १० ऑगस्ट २०१७ रोजी केल्याचे सांगितले.तर त्या प्रस्तावाल १३ ऑक्टोंबर रोजी मुख्य अभियंता कार्यालयाने शासनाकडे सादर केल्याची माहिती दिली.पुर्व व पश्चिम बायपासच्या वाढीव मोबदल्यासाठी १२ कोटी रुपयाची मागणी करण्यात आल्याचे सांगत पहिल्या टप्यात ३ कोटी ९८ लाख रुपये मागितले असून शासनाकडून अद्यापही रक्कम न मिळाल्याने देता आलेली नाही.परंतु आज सध्यास्थितीत कार्यालयाकडे असलेले ५ लाख रुपये गोपलांनी यांना देण्यात येत असून उर्वरित रक्कम पुढच्या न्यायालयीन तारखेपर्यंत देण्याबाबत कारवाई करण्यात येणार असल्याची ग्वाही कार्यकारी अभियंता यांनी दिल्याची माहिती अ‍ॅड.राजनकर यांनी दिली.त्यामुळे बांधकाम विभागावर वाढीव मोबदल्यासाठी होणारी जप्तीची कारवाई टळली.