राष्ट्रीय फलोत्पादन अभियान शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

0
92

गोंदिया,दि.१० : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान हे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. हे अभियान सन २०१४-१५ पासून राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांनी सुटी फुले, मसाला पिके, आंबा लागवड, हरित गृह, शेडनेट हाऊस, मल्चिंग, पॉली हाऊसमधील उच्च दर्जाचा भाजीपाला लागवड साहित्य व निविष्ठा, मनुष्यबळ विकास कार्यक्रम, पॅक हाऊस इत्यादी घटकांसाठी लाभ देण्यात येतो. जिल्ह्यातील अनुसूचित जाती १६.२ टक्के, अनुसूचित जमाती ८ टक्के, महिला ३० टक्के व अपंग ३ टक्के या प्रर्वगातील शेतकऱ्यांसाठी विहित लक्षांकाप्रमाणे खर्च करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातील हॉर्टनेट लागू असणाऱ्या बाबींसाठी (पॅक हाऊस वगळता) वैयक्तीक शेतकरी, उद्योजक, संस्था यांना लाभ घेता येईल. या बाबीसाठी हींीं:ि//ुुु.हेीींपशीं.र्सेीं.ळप या संकेतस्थाळावरुन ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच ज्यांना ऑनलाईन अर्ज करण्याबाबत माहिती नसेल त्यांचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने तालुका कृषि अधिकारी कार्यालयातून भरण्यात येईल. तरी शेतकऱ्यांनी अर्ज भरण्याची कार्यवाही लवकर करावी. लक्षांकापेक्षा अर्ज जास्त प्रमाणात प्राप्त झाल्यास लाभार्थ्यांची निवड लॉटरी पध्दतीने करण्यात येईल.
लाभार्थ्यांची नावे, जमीन असल्याचा सातबारा, आठ-अ व नकाशा, प्रकल्प प्रस्तावाची विहित प्रपत्र/करारनामा, हमीपत्र, सविस्तर प्रकल्प अहवाल, आधारकार्डची झेरॉक्स, आधारसंलग्न बँक खाते क्रमांक, बँक पुस्तकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स आदी कागदपत्रे सोबत जोडावी लागणार आहे. पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर विहीत कालावधीत म्हणजेच ३० दिवसाच्या आत शेतऱ्यांनी कार्यवाही करणे आवश्यक आहे. अन्यथा विहीत कालावधीत काम पूर्ण न केल्यास पूर्वसंमती आपोआप रद्द होईल. पूर्वसंमती रद्द झाल्यानंतरही पुन्हा पूर्वसंमती घेण्याकरीता शेतकरी पात्र राहील. परंतू यादीतील क्रमांकानुसार शेतकऱ्यास लाभ देण्यात येईल. योजनेचे सविस्तर निकष व मापदंड ुुु.पहा.पळल.ळप या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सद्यस्थितीत या योजनेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी अनुदान उपलब्ध आहे.
जिल्हा हा आदिवासी बहुल असल्यामुळे अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्याने लाभ देण्यात येणार असून ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे (मो.९४०५२१९४७८) व कार्यालयाच्या ०७१८२-२५०३७३ या दूरध्वनीवर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे यांनी केले आहे.