जिल्हास्तरीय स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा १६ जानेवारीला

0
12

गोंदिया,दि.11ः जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात १६ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता जिल्हास्तरीय स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पध्रेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छतेच्या प्रश्नावर युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी या स्पध्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुकास्तरावरील कनिष्ठ व वरिश्ठ महाविद्यालयीन गटातील प्रथम व व्दितीय आलेल्या स्पर्धक विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय स्पध्रेत भाग घेता येणार आहे. जिल्हास्तरीय स्पध्रेसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी बदलण्या गावाची दशा-संपूर्ण स्वच्छतेचा घेऊ वसा, हागणदारीमुक्तीतून- शाश्‍वत स्वच्छतेकडे, शाश्‍वत स्वच्छता आरोग्यासाठी-स्वच्छ सुंदर महाराष्ट्रासाठी, उठ तरूणा जागा हो-शाश्‍वा स्वच्छतेचा धागा हो, शुद्ध पाणी स्वच्छ गाव-सुखी होण्या रंक नि राव, हे विषय राहणार आहे. तर वरिष्ठ गटासाठी विचार तरूणाईचा-स्वच्छ सुंदर गावांचा, घालू जागर स्वच्छतेचा-शोधू मार्ग शाश्‍वत विकासाचा, संकल्प माझा महाराष्ट्रासाठी-शाश्‍वत स्वच्छतेचा भविष्यासाठी, पाण्याची गुणवत्ता-आरोग्याची सुबत्ता, स्वच्छ महाराष्ट्राच्या संकल्पपूर्तीकडे हे विषय राहणार आहेत.
जिल्हास्तरीय स्पध्रेत दोन्ही गटात प्रथम आलेल्या स्पर्धकांना प्रत्येकी अकरा हजार रूपये, व्दितीय सात हजार व तृतीत आलेल्या स्पर्धकांना पाच हजार रूपये, स्मृती व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार असून त्यांना साधन व्यक्तीचा दर्जा सुद्धा बहाल केला जाणार आहे.
जिल्हास्तरीय स्पध्रेत प्रथम विजेत्याची राज्यस्तरीय स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पध्रेसाठी निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती व स्पध्रेत मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.व्ही.राठोड यांनी केले आहे.