बँक ऑफ इंडियाच्या वतीने विश्व हिंदी दिवस साजरा

0
14

गोंदिया,दि.११ : बँक ऑफ इंडियाच्या वतीने १० जानेवारी रोजी विश्व हिंदी दिवस छोटा गोंदिया येथील विवेक मंदिर हायस्कूल येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अग्रणी प्रबंधक दिलीप सिल्हारे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नीरज जागरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक राजेंद्र शुक्ला, रविंद्र पहिरे, माजी नगराध्यक्ष के.बी.चव्हाण, विवेक मंदिरच्या प्राचार्य नीता करवटकर यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी विश्व हिंदी दिवसाचे औचित्य साधून उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी काटकसर-सुखी जीवनाचा आधार या विषयावर भाषण स्पर्धा तसेच प्रश्न मंजुषा सुध्दा घेण्यात आली. भाषण स्पर्धेत प्रथम बक्षिस गुरुप्रित ठकरानी, द्वितीय बक्षिस आयुष भाग्यवानी, तिसरे बक्षिस इतिशा चावला, चवथे बक्षिस हिना रहांगडाले व पाचवे बक्षिस महिमा अग्रवाल यांना देण्यात आले. तसेच या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल साक्षीका लाडेकर, श्रेया भोयर, कनिका अग्रवाल, रिया जैन, संस्कार अग्रवाल यांना उत्तेजनार्थ बक्षिसे म्हणून पेन, प्रमाणपत्र तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाला विवेक मंदिरचे शिक्षकवर्ग तसेच दहावी, अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन बँक ऑफ इंडियाचे मार्केटिंग अधिकारी रितेश पांडे यांनी केले. उपस्थितांचे आभार हिना अग्रवाल यांनी मानले.