जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते शुभारंभ जलयुक्त शिवार अभियानाची फिरत्या चित्ररथाद्वारे प्रसिध्दी

0
11

गोंदिया,दि.१२ : टंचाईमुक्त महाराष्ट्रासाठी आणि शेतीला संरक्षीत सिंचनाची व्यवस्था निर्माण होण्यासोबतच पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब सिंचनासाठी कसा वापरात आणता येईल याचे महत्व जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून ग्रामस्थांना पटवून देण्यासाठी या अभियानाच्या फिरत्या चित्ररथाचा शुभारंभ नुकताच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित करण्यात आला.
जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी जलयुक्त शिवार अभियानाची प्रचार-प्रसिध्दी करणाऱ्या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, सहायक वनसंरक्षक श्री.शेंडे, श्रीमती भोपळे, श्री.कोटांगले यासह कृषि विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा चित्ररथ जिल्ह्यातील निवडक ६४ गावात फिरणार आहे. त्यामुळे तेथील ग्रामस्थांना जलयुक्त शिवार अभियानाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.