शेतकर्‍यांच्या अभ्यास दौर्‍याला सुरुवात

0
5
गोंदिया(एकोडी),दि.16 : तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथील कृषी विकास बचतगट समुहाच्या माध्यमातून आजपासून अभ्यास दौर्‍याला सुरुवात करण्यात आली आहे. या अभ्यास दौर्‍याच्या माध्यमातून शेती अधिक कशी चांगली करता येईल या दृष्टीकोणातून लाभ घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आज सकाळी सेजगाव येथील सुमारे १५ शेतकरी या दौर्‍यासाठी रवाना झाले.
कृषी विभागाच्या वतीने शेतकर्‍यांसाठी प्रत्येकवर्षी अभ्यास दौर्‍याचे आयोजन करण्यात येते.परंतु या दौर्‍यापासून अनेक शेतकरी वंचित राहताता तसेच कृषी विभागाकडूनही शेतकर्‍यांना पुरेपुर माहिती मिळत नाही. त्या दृष्टीकोणातून सेजगाव येथे कृषी विकास बचत गट तयार करण्यात आले. बचत गटाच्या माध्यमातून कमकुवत शेतकर्‍यांना आर्थिक मदतीसह उपाययोजनाही सुचविण्यात येतात. त्या अनुषंगाने या समुहातील शेतकर्‍यांचा तसेच सभासदांना अधिक  कृषी विषयक माहितीचा ज्ञान हवा यासाठी हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौर्‍यात सरपंच कंठीलाल पारधी, सेवा निवृत्त कृषी सहाय्यक सुरजलाल पारधी, टोलीराम गौतम, किशनलाल बिसेन, राजु नंदुरकर, गौरीशंकर पारधी,  डॉ. त्रिलोक पारधी, डॉ.  महेंद्र पारधी, अरुण कठाणे, डॉ.  किशोर पारधी, शोभेलाल बिसेन, कुशराम सोनवाने, श्यामलाल गायधने आदी शेतकर्‍यांचा समावेश आहे.