क्षेत्रीय ग्रामीण कार्य कार्यक्रमाचे उदघाटन

0
7
आकाश पडघन
वाशिम-दि 16ः-  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ सलग्नीत श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय, वाशिम येथील  विद्यार्थानी क्षेत्रकार्यांर्अतर्गत ग्रामीण शिबिराचे आयोजन नागठाणा येथेकरण्यात आले.यावेळी गावातील समस्ये बाबत विठ्ठल सोळंके यांनी असे सांगीतले,की भारत हा स्वचतेचा व सुंदरतेचा संदेश देणारा देश आहे. संपूर्ण भारत मग प्रत्येक खेडे प्रत्येक गाव हागणदारीमुक्त झाले पाहिजे. प्रत्येक घराघरात शौचालय बांधून त्यांचा नियमित वापर केला पाहिजे. जेणे करून गाव हागणदारीमुक्त होईल या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री महादेवराव सोळंके होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री विठ्ठलराव सोळंके (सरपंच), श्री प्रल्हाद सुरूशे ( पोलीस पाटील ), मुख्याध्यापक इंगळे सर , तंटामुक्ती  अध्यक्ष बंडोपंत सुरुशे  तसेच मार्गदर्शक प्रा. राठोड मॅडम, प्रा. मडावी सर, प्रा. राऊत सर उपस्थित होते . या कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी प्रदीप टेकाडे, अक्षय गवई, सय्यद शाहरुख , तेजस राऊत, विनायक सोळंके, निलेश रणबावळे, वैभव आंभोरे, आकाश   सावसुंदर, गजानन कालवे, विशाल थोरात,आकाश पडघन,प्रियंका चाटी, साक्षी गोडाळ, वैष्णवी देशमुख, आरती पवार, माधुरी गोटे, गायत्री काळे, शिल्पा इंगोले यांनी परिश्रम घेतले.