प्रत्येक बुथवर तीनशे सदस्य अनिवार्य – सुनिल बढे

0
13

गोंदिया-: भारतीय जनता पक्षातर्फे यावेळेस राबविण्यात येणारी सदस्यता मोहीम ही मोबाईलद्वारे असल्याने वेगळी आहे. या पद्धतीमध्ये कुणीही कुणाला जबरदस्तीने सदस्य करू शकत नाही व कुणी कोणाला सदस्य होण्यापासून रोखूही शकत नाही. भाजप हा लोकतांत्रिक पक्ष असून येथे सामान्य कार्यकर्ता पंतप्रधान होवू शकतो. राजकारण वेगाने बदलत चालले आहे. याची जाणीव वेळेवर झाली नाही तर मोठे नुकसान होईल. ‘परफॉर्मेंस व रिजल्टङ्क या दोन गोष्टीवर पुढील राजकारण चालणार आहे. जो काम करेल त्याला पद व संधी मिळणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोपविलेल्या जबाबदारीला पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी गांभिर्याने घेउल अभियान यशस्वी करावे. लोकशाहीमध्ये खरी लढाई बुथवर लढली जाते, त्यामुळे प्रत्येक बुथवर कमीत-कमी तीनशे सदस्य करायचेच आहे. यात शंभर युवा व शंभर महिला असणे गरजेचे असून प्रत्येक पदाधिकाèयाला एक बुथची जबाबदारी द्यावी व ११ व १२ फेबु्रवारीला पं. दिनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त ‘एक बुथपर-दो दिनङ्क प्रमाणे काम करून आपल्या बुथवर प्रत्येक घरी भेट देवून सदस्य नोंदणी करावी, असे कार्यकत्र्यांना संबोधित करताना भाजपचे प्रदेश महामंत्री व सदस्य नोंदणी प्रमुख सुनिल बढे यांनी सांगितले.
ते मयूर लॉन्स येथे आयोजित भाजपच्या जिल्हा सदस्य नोंदणी आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, आमदार विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, माजी आ. खुशाल बोपचे, केशव मानकर, भेरqसह नागपुरे, खोमेश रहांगडाले, प्रदेश सदस्य राकेश शर्मा, अशोक इंगळे, जि.प. सभापती मोरेश्वर कटरे, संघटन मंत्री आशिष वांदिले, अजय भोले, प्रदेश महिला मोर्चा सचिव रचना गहाणे, जिल्हा महामंत्री संतोष चव्हाण, विरेंद्र अंजनकर, दीपक कदम, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सीता रहांगडाले, सुभाष आकरे, जिल्हा उपाध्यक्ष झामqसग येरणे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना बढे म्हणाले की, गोंदिया जिल्हा हा श्रद्धेय लक्ष्मणराव मानकारांच्या जिल्हा आहे. यामुळे या जिल्ह्यात सर्वाधिक सदस्य होणार असल्याची खात्री आहे. जनता व शासनामधला दुवा हा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्याने शासनाकडून जनतेसाठी केल्या जाणाèया कल्याणकारी योजना व कामाची माहिती त्यांना द्यावी व त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम करावे. गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका असल्याने अधिकाधिक सदस्य करण्याकरीता कामाला लागल्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाध्यक्ष अग्रवाल यांनी प्रास्ताविकातून गोंदिया जिल्ह्यातील सदस्य नोंदणी संदर्भात माहिती दिली. यात त्यांनी आजपर्यंत जिल्ह्यात कार्यकत्र्यांकडून ६७ हजार सदस्य झाले असून जिल्ह्याची सदस्य संख्या २ लाखांच्यावर लवकरच पूर्ण केली जाणार असल्याचे सांगितले. यावेळी मंडळ अध्यक्ष व सदस्य नोंदणी प्रमुखांकडून सुनिल बढे यांनी आढावा घेतला. याप्रसंगी अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यांचे स्वागत जिल्हाध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच श्री बढे व भोले यांचा शाल, श्रीफळ देवून जिल्हा भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळ अध्यक्ष रधुनाथ लांजेवार, नंदकुमार बिसेन, खेमराज लिल्हारे, चतुर्भूज बिसेन, शामलाल शिवणकर, प्रमोद संगीडवार, अ‍ॅड. येसूलाल उपराडे, लोकप्रतिनिधी, जि.प. प्रमुख, पं.स. प्रमुख व जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे संचालन महामंत्री विरेंद्र अंजनकर यांनी केले.