सायबर गुन्हेगारी व ऑनलाईन बँकींगबाबत जनजागृती अभियान कार्यशाळा

0
10

गोंदिया,दि.२२ : आज संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. सध्याच्या या डिजीटल युगामध्ये नागरिकांचा संगणकाद्वारे ऑनलाईन सेवेशी मोठ्या प्रमाणात संबंध येत आहे. सोशल मिडियाचा देखील मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. सोशल मिडियाचा वापर आणि डिजीटल व्यवहाराशी संबंधित सायबर गुन्ह्यांचे प्रमाण त्यामुळे वाढले आहे. ट्रान्सफार्मींग महाराष्ट्र याअंतर्गत सायबर गुन्हेगारी व ऑनलाईन बँक व्यवहाराची माहिती प्रसारमाध्यम प्रतिनिधी, प्रतिष्ठीत नागरिक व युवावर्गाला देण्यासाठी पोलीस विभाग व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आज २३ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या प्रेरणा सभागृहात सायबर जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळेचे उदघाटन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे हे करतील. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यशाळेत सायबर तज्ञ पियुष वर्मा हे सोशल मिडियावर आणि आयसीआयसीआय बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक कमलेश वालदे हे ऑनलाईन बँक व्यवहाराबाबत माहिती देणार आहे. तरी जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी, प्रतिष्ठीत नागरिकांनी व महाविद्यालयीन युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन पोलीस विभाग व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.